Cutbona Jetty Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

Cutbona Jetty Cholera Cases: : कुटबण जेटीवर अतिसाराचे सहा रुग्ण आढळून आल्यानंतर या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग आणि आरोग्य खाते यांनी मानक कार्यप्रणाली (एसओपी) लागू केल्या आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: कुटबण जेटीवर अतिसाराचे सहा रुग्ण आढळून आल्यानंतर या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग आणि आरोग्य खाते यांनी मानक कार्यप्रणाली (एसओपी) लागू केल्या आहेत. या आजाराचे साथीत रूपांतर होऊ नये यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

या सहा रुग्णांपैकी एकाला कॉलराची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले होते. आरोग्य खात्याने जेटीवर आरोग्य तपासणीची व्यवस्था केली असून ज्यामध्ये राज्याबाहेरून येणाऱ्या कामगारांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. सर्व कामगारांची या ठिकाणी तपासणी केली जात असून वैध आरोग्य कार्ड असलेल्या व्यक्तींनाच मासेमारी जहाजांवर चढण्याची परवानगी दिली जात आहे, अशी माहिती संबंधितांनी दिली.

जलजन्य आणि कीटकजन्य रोगांचा धोका कमी करण्यासाठी खबरदारी अधिक तीव्र करण्यात आली आहे. स्वच्छता, सुरक्षित कचरा विल्हेवाट आणि स्वच्छ पाणी पिण्याबद्दल कामगारवर्गामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘एसओपी’ आणि माहितीपूर्ण पोस्टर्स वितरित करण्यात आली आहेत.

कुटबण जेटीवरील अधिकारी कामगारांना आवश्यक आरोग्य पद्धतींबद्दल शिक्षित करण्यासाठी मच्छीमारांच्या संस्थांशी सक्रियपणे संवाद साधत आहेत. या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी, जेटीवरील स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन!

गेल्या वर्षी या जेटीवर कॉलराचा प्रादुर्भाव झाला होता. मोठ्या संख्येने कामगार आजारी पडून काहीजणांचे बळीही गेले होते. त्यामुळे यंदा मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला आरोग्य खात्याने कामगारांच्या वैद्यकीय तपासणीवर भर दिलेला आहे. या जेटीवर अलीकडेच बांधलेली ५० शौचालये सध्याच्या शौचालयांसोबत उघडण्यात आली आहेत, ज्यामुळे एकूण शौचालयांची संख्या ६९ झाली आहे.

कामगारांना यापुढे कुठेही उघड्यावर शौचास जाण्यास मनाई केली जाणार आहे. मच्छीमारांना स्वच्छता सुविधांचा वापर करण्याचे आणि आजाराच्या कोणत्याही लक्षणांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी जेटीवर नियमित स्वच्छता मोहीम आणि फॉगिंग केले जात आहे.

मोबोर येथील कामगारांची तपासणी होते का?

१मत्स्योद्योग संचालक डॉ. शर्मिला मोन्तेरो यांनी कुटबण मासेमारी स्थलांतरित जेटीवर कामगारांची तपासणी जोरात सुरू असल्याचा दावा केला असला, तरी साळ नदीच्या मोबोरच्या बाजूनेही मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांची तपासणी केली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

२केळशी गावचे सरपंच डिक्सन वाझ यांनी मत्स्योद्योग संचालक तसेच आरोग्य अधिकाऱ्यांकडून मोबोर येथून चालणाऱ्या मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या तपासणीसाठी सरकारने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत का, याची माहिती मागितली आहे.

३मोबोर येथे स्वच्छता आघाडीवर सर्वकाही ठीक नाही. तिथे मासेमारी नौका लोडिंग-अनलोडिंगसाठी आणि उभ्या केल्या जातात. मोबोर येथे अनधिकृत पद्धतीने चालणाऱ्या जेटीची अचानक तपासणी केली होती. तेथील अस्वच्छतेबद्दल मी नाराज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT