Cutbona Jetty Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: 1655 खलाशांची तपासणी, कॉलराची 13 प्रकरणे; कुटबण जेटीवर उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Goa Jetty: कुटबण मच्‍छीमारी जेटीवरील वाढत्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जेटीवर संबंधितांची बैठक घेण्यात आली.

Sameer Panditrao

सासष्टी: कुटबण मच्‍छीमारी जेटीवरील वाढत्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जेटीवर संबंधितांची बैठक घेण्यात आली. तसेच परिसराची पाहणी करून संबंधितांना आवश्‍यक त्‍या सूचना करण्‍यात आल्‍या.

या बैठकीला वेळ्‍ळी सरपंच वीणा कार्दोझ, मत्स्यव्यवसाय खात्याच्या सुनीता पावसकर, आरोग्य खात्याच्या डॉ. बनेदीता डायस, मामलेदार, विविध खात्यांचे अधिकारी तसेच ‘गोवा कॅन’चे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. डायस यांनी सांगितले की, आतापर्यंत १६५५ खलाशांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्‍यातून कॉलराची १३ प्रकरणे आढळली असून या सर्वांवर उपचार सुरू आहेत. आवश्‍‍यक खबरदारी घेऊनही कॉलरा व डायरियाचे रुग्ण सापडले याचे एक कारण म्‍हणजे दोघे-तिघे खलाशी मजूर गावांतून येताच त्यांना त्रास जाणवू लागला. आम्ही त्यांना शौचालयातून हात स्‍वच्‍छ साबणाने धुण्‍याचा तसेच पाणी उकळून पिण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

सरपंच वीणा कार्दोझ म्‍हणाल्‍या की, गेल्या वर्षीच्या घटनांनंतर सर्वतोपरी खबरदारी यावेळी घेण्‍यात आली आहे. ही समस्‍या मासेमारी मोसमाच्या सुरवातीलाच निर्माण होते. एकदा मजूर ट्रॉलरवरून समुद्रात गेले की समस्‍या जाणवत नाही.

आता वर्षभर मजुरांची तपासणी केली जाते. पाण्याचा त्रास त्यांना जाणवत असावा अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. येथे पाणी टॅंकरमधून आणले जाते. मात्र ट्रॉलरवरील पाण्याची त्यांना बाधा होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

Goa Today Live News: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT