Cutbona Fishing Jetty Dainik Gomantak
गोवा

Cutbona Fishing Jetty: कुटबण जेट्टीवर पुन्हा कॉलराचा उद्रेक; 6 रुग्ण आढळले, एकाची प्रकृती गंभीर

Cholera Cases at Cutbona: कटबोना जेट्टी परिसरात कॉलराच्या साथीने चिंता वाढवली आहे. येथे एकूण सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे.

Sameer Amunekar

कुटबण जेट्टी परिसरात कॉलराच्या साथीने चिंता वाढवली आहे. येथे एकूण सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर रुग्णाला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले आहे. उर्वरित पाच रुग्ण हे संशयित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सर्व रुग्ण हे ओडिशा राज्यातील स्थलांतरित कामगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे कामगार आगामी मासेमारी हंगामासाठी कटबोना जेट्टी परिसरात अलीकडेच आले होते. स्थलांतरित मजुरांच्या मोठ्या प्रमाणातील हालचालीमुळे संसर्गजन्य रोग पसरू नये यासाठी संबंधित विभागांनी तातडीने हालचाल केली आहे.

आरोग्य विभागाने परिसरात सतर्कता वाढवली असून सर्व नव्याने आलेल्या स्थलांतरितांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना उपसंचालक (एनसीडी) उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले की, “कॉलराच्या रुग्णांची तातडीने तपासणी व उपचार सुरू आहेत. पाणी आणि अन्न स्वच्छतेसंदर्भात सर्व मासेमार आणि स्थलांतरितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परिसरात आरोग्य पथकांकडून नियमित देखरेख केली जात आहे.”

मत्स्यव्यवसाय विभागाने सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली असून, कटबोना जेट्टी परिसरात सुरक्षित आणि निरोगी वातावरण राखण्याचे आश्वासन दिले आहे. विशेषतः उकळलेले पाणी पिणे, अन्न स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छता पाळणे यावर भर देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT