road is bad Dainik Gomantak
गोवा

Curtorim News : भाजपला मतदान केले म्हणून कुडतरी आमदारांकडून रस्ता दुरुस्तीस नकार - ग्रामस्थ

वागुळी ग्रामस्थांचा आरोप : मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

वागुळी मायणा (कुडतरी) येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील लोकांची आहे. परंतु या भागातील लोकांनी मागच्या विधानसभा निवडणूकीत भाजप उमेदवाराला मते दिली म्हणून संबंधित कामे करण्यास स्थानिक आमदारांनी नकार दिल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान रस्ते, पाणी, वीज या लोकांच्या मूलभूत गरजेच्या बाबी असल्याने त्यात आमदारांनी राजकारण आणू नये, अशी मागणी भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी केली आहे.

वागुळी हा मायणा भागातील लहानसा वाडा असून या वाड्याला जोडणाऱ्या चारही रस्त्यांची पार दुर्दशा झाली असून पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरुस्ती करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी त्यांची पाहाणी केली. या प्रश्नात मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी लक्ष घालावे आणि लोकांची अडचण दूर करावी, अशी मागणी बार्बोजा यांनी केली.

यावेळी बोलताना बार्बोजा म्हणाले, या भागात स्थानिक भाजप मंडळाने हल्लीच आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी इथल्या ग्रामस्थांनी ही रस्त्याची गोष्ट आमच्या निदर्शनात आणून दिली. या रस्त्यांचे डांबरीकरण केल्यास किमान 20 वर्षे उलटली असून या रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी घेऊन हे लोक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडे गेले.

तेव्हा तुम्ही मागच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले होते. त्यामुळे तुमचे काम होणार नाही, असे आमदारांनी आपल्याला सांगितले, असा आरोप त्यांनी केला.

मात्र, गोव्यात भाजपची राजवट असून हे सरकार कुणावरही अन्याय करत नाही. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन आम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री काब्राल यांच्याकडे जाऊन प्रयत्न करेन, असे बार्बोजा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT