Curtorim Leader Moreno Rebelo Resigns BJP

 

Dainik Gomantak

गोवा

एकाच महिन्यात पदाधिकाऱ्याचा भाजपला 'रामराम'

कुडतरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांची भाजपला सोडचिट्ठी!

दैनिक गोमन्तक

मडगाव: फक्त एका महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले कुडतरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो (Curtorim Leader Moreno Rebelo) यांनी भाजपला राम राम ठोकला. देशात भाजपकडून अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले याचा निषेध म्हणून आपण भाजप सोडल्याचे त्यांनी सांगितले.

देशात भाजपकडून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे आपल्या कुटुंबियांसह सर्व लोकांची भाजप विरोधी भावना निर्माण झाली आहे त्यासाठीच मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. रिबेलो यांच्या पत्नी मिशेल रिबेलो या सध्या कुडतरीच्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायत सदस्य आहेत.

या डिसेंबर महिन्याच्या सुरवातीलाच रिबेलो यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या उपस्थितीत भाजपात (BJP) प्रवेश केला होता. कुडतरीत विकासकामांना चालना मिळावी यासाठी आपण भाजपात गेलो होतो. पण त्याही बाबतीत माझी निराशा झाली. मी पैसे घेऊन भाजपात गेल्याचा आरोप माझ्यावर माझ्या विरोधकांनी केला. मात्र आज मी राजीनामा दिल्यामुळे त्या आरोपात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे असे ते म्हणाले.

रिबेलो यांनी भाजप सोडण्यामागे अल्पसंख्याकांवरील हल्ले असे दिलेले असले तरी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा दिल्याने आता उमेदवारी खुली झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला गेला असे सांगितले जाते. यापूर्वी रिबेलो यांनी कुडतरीतून काँग्रेस उमेदवारीवर दावा केला होता. पण रेजिनाल्ड आमदार असल्याने त्यांना काँग्रेस उमेदवारी मिळणे कठीण असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी काँग्रेस उमेदवारीवर कुडतरीतून निवडणूक (Assembly Election) लढवावी असा त्यांना आग्रह त्यांच्या समर्थकांनी केल्याने त्यांनी भाजप सोडल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT