Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

Ponda: फाेंड्याच्या राजकारणाला नवे वळण! कुर्टी-खांडेपारमध्ये काँग्रेस-मगोप सत्तेत वाटेकरी; वर्चस्‍व मात्र भाजपचे

Ponda Politics: गेल्या पावणेतीन वर्षांत या पंचायत मंडळावर चार सरपंच झाले. नुकतेच सत्तारूढ झालेले नीळकंठ नाईक हे या पंचायतीचे पाचवे सरपंच.

Sameer Panditrao

फोंडा: ‘किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम’ या गाण्याचा प्रत्यय जेवढा फोंडा मतदारसंघातील एकमेव पंचायत कुर्टी- खांडेपार पंचायतीत येतो, तेवढा अन्य कोठेही येणे कठीणच.

गेल्या पावणेतीन वर्षांत या पंचायत मंडळावर चार सरपंच झाले. नुकतेच सत्तारूढ झालेले नीळकंठ नाईक हे या पंचायतीचे पाचवे सरपंच. ऑगस्ट २०२२ साली झालेल्या निवडणुकीत या पंचायतीत भाजपचे पाच, मगोपचे चार, काँग्रेसचे एक पंच असे सांख्यिक बळ होते. सुरुवातीला ही पंचायत मगोपकडे होती.

पण तत्कालीन सरपंच नावेद तहसीलदार यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर ही पंचायत भाजपकडे गेली; पण त्यावेळी भाजपला काँग्रेसच्या एकमेव पंचसदस्य विल्मा परेरा यांची मदत घ्यावी लागली होती; पण त्यानंतरच्या एका घडामोडीत मगोपचे नीळकंठ नाईक हे भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपच्या पंचसदस्यांची संख्या सहावर पोचली.

याच बळावर भाजप स्वतःचे पंचायत मंडळ स्थापन करू शकला. पण हल्लीच सरपंच अभिजीत गावडे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर पुन्हा पेच निर्माण झाला. अपक्ष पंच भिका केरकर यांना गटविकास अधिकाऱ्यांनी मागील एका प्रकरणावरून अपात्र ठरविल्यानंतर पंचायतीवर प्रशासक नियुक्त केला.

नंतर न्यायालयात धाव घेऊन गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश रद्दबातल केल्यामुळे भिका पात्र ठरले; पण यामुळे सध्या ही पंचायत एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आता या नव्या पंचायत मंडळात भाजपबरोबर काँग्रेस व मगोपही सामील झाल्यामुळे पंचायतीला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे.

नवनिर्वाचित सरपंच नीळकंठ नाईक यांनी, मी भाजपचाच असल्याचा दावा केल्यामुळे ही पंचायत अजूनही भाजपचीच असल्याचे स्पष्ट झाले असले तरी मागील सरपंच अभिजीत गावडे जे भाजपचे आहेत, त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणणाऱ्या पंचांमध्ये नीळकंठ नाईकही होते, हे विसरता कामा नये. नीळकंठ हे भाजपच्याच मनीष नाईक यांचा पराभव करून सरपंचपदी आरूढ झालेत, हेही तेवढेच

खरे. कुर्टी- खांडेपार पंचायत ही फोंडा मतदारसंघातील एकमेव पंचायत असल्यामुळे आणि या पंचायतीतल्या मतदारांची संख्या जवळपास फोंडा पालिकेएवढी असल्यामुळे या पंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून त्याचेच प्रात्यक्षिक पंचायत मंडळाच्या राजकारणात बघायला मिळत आहे. फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक हे सध्या तटस्थ वाटत असले तरी ते केव्हा आपल्या बाह्यातील पत्ते बाहेर काढतील हे सांगणे मात्र कठीण आहे.

Khari Kujbuj Political Satire

‘झेडपी’वर नजर ठेवून खेळी

कुर्टी- खांडेपार पंचायतीत सध्या दोन्हीही बाजूला भाजपच दिसत आहे. आता यामागे नेमकी कोणती रणनीती आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी सहा महिने दूर असलेल्या झेडपी निवडणुकीवर लक्ष ठेवून काही घटकांकडून ही खेळी खेळली जात असल्याचे बोलले जात आहे.

पंचायत मंडळात वेगळेच रसायन

तत्कालीन सरपंच अभिजीत गावडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर नीळकंठ नाईक यांनी परत मगोपमध्ये प्रवेश केल्याच्या वावड्या उडविल्या गेल्या होत्या. पण नवनिर्वाचित सरपंच नीळकंठ यांनी आपण भाजपचेच असल्याचे सांगितल्यामुळे या पंचायतीवर असलेले भाजपचे राज्य कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, सरपंचांना तीन मगोप, एक काँग्रेस व एका अपक्ष पंचांचा पाठिंबा असल्यामुळे या पंचायतीत एक वेगळेच रसायन तयार झाले असून त्याचा परिणाम फोंड्याच्या भविष्यातील राजकारणावर होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

रवी नाईकांची भूमिका ठरणार निर्णायक

आगामी झेडपी निवडणुकीवेळी कुर्टी मतदारसंघात भाजप विरुद्ध मगोप असा सामना रंगू शकतो. सध्या येथे विद्यमान सदस्य मगोपच्या प्रिया च्यारी असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवू शकतो. याचेच पडसाद सध्या खांडेपार पंचायतीत उमटू लागले आहेत. त्यामुळे कृषिमंत्री रवी नाईक हे याबाबत कोणते पाऊल उचलतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT