Goa Shigmotsav Festival News, Goa Festival News, Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav: गोमंतकीयांना उत्‍सुकता शिगमोत्सवाची

जय्‍यत तयारी: शनिवारपासून ‘ओस्सय...ओस्सय’ने दुमदुमणार आसमंत

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात शिगमोत्सवाची तयारी जय्यत सुरू असून, गोमंतकीय जनतेचा हा महत्‍वाचा तसेच पारंपरिक सण आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी शासकीय शिगमोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. यंदा 19 मार्च रोजी फोंड्यातून शिगमोत्सव मिरवणुकीला आरंभ होणार आहे. 20 रोजी रोजी मडगाव, 22 मार्च वास्को, 26 मार्च पणजी व 27 मार्च रोजी म्हापसा येथे मिरवणूक निघणार आहे. (Goa Shigmotsav Festival News Updates)

राज्यातील प्रत्येक गावाचे शिगमोत्सवाचे वेगळेपण आहे. हा उत्‍सव साजरा करण्याच्या प्रत्येक गावाच्या विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरा आहे. गोव्याच्या लोकसंस्कृती तसेच लोकपरंपरांचा संगम शिगमोत्सवात पाहायला मिळतो. गुलाल उधळणे, घोडेमोडणी, करवली, न्हावण, गडे असे विविध पारंपरिक तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अनेक नागरिक शिगमोत्सवात सहभागी झाले नव्हते. मात्र यंदा राज्यात लसीकरण पूर्ण झाल्याने तसेच महामारीचा प्रार्दुभाव कमी झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दरम्‍यान, रणमाले हा लोककलाप्रकार प्रामुख्याने शिगमोत्सवात साजरा केला जाणारा प्रकार असून सत्तरीच्या डोंगर माथ्यावरील गावांत तो प्रामुख्‍याने दिसून येतो.

रंग, गुलाल, पिचकाऱ्यांनी बाजारपेठा सजल्या

शिगमोत्सवाच्या खरेदीसाठी गोव्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. विविध प्रकारचे रंग, गुलाल, पिचकाऱ्या तसेच मुखवटे आदींची दुकाने बाजारात पाहायला मिळतात. पणजी बाजार संकुलाच्या बाहेर रंगपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याची लहान रंगाची पाकीटे 10 ते 20 रूपयांना उपलब्ध आहेत. तर पिचकाऱ्यांचा दर 60 ते 120 रूपये आहे. तसेच रंग देखील 100 ते 120 रूपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. या सणामुळे बाजारात गर्दी वाढू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT