Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'लव जिहाद'ला प्रोत्साहन देणारी जिम बंद करा! कुडचडेत ग्रामस्थांचा मोर्चा; लैंगिक अत्याचार करणाऱ्या मालकाच्या अटकेसाठी दबाव

Curchorem Bogmalo Rape Case: सदर प्रकरण वास्को पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्यामुळे कुडचडे पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याचा अहवाल वास्को पोलिसांना सादर केला आहे.

Sameer Panditrao

केपे: जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या महिलेवर जिम मालकानेच बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होऊन आठवडा उलटून गेला तरीही त्याला अटक करण्यास पोलिस अपयशी ठरल्यामुळे बजरंग दलाच्या गोवा विभागाने कुडचडेच्या हायड्रा फिटनेस या व्यायाम शाळेवर मोर्चा नेऊन लव जिहादला प्रोत्साहन देणारी सदर व्यायामशाळा त्वरित बंद करावी, अशी मागणी केली.

आठ जून रोजी बोगमाळो येथील एका हॉटेलवर ही बलात्काराची घटना घडली होती. व्यायाम शाळेत व्यायामासाठी येणाऱ्या महिलेला आपल्या प्रेमप्रशात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सरवर खान याच्यावर करण्यात आला आहे.

या मालकाने पहाटे तिला आपल्या गाडीतून कुडचडेवरून बोगमोळो येथे नेले व बलात्कार केला. तसेच त्या महिलेला केलेल्या जबर मारहाणीमुळे तिने घाबरून पोलिसात तक्रार केली नव्हती.

मात्र खान याने तिच्यावर अत्याचार करणे सुरूच ठेवल्यामुळे अखेर तिने कुडचडे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

सदर प्रकरण वास्को पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्यामुळे कुडचडे पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याचा अहवाल वास्को पोलिसांना सादर केला आहे. त्या अनुषंगाने वास्को पोलिसांनी सरवर खान याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पोलिस त्याचा शोध घेत असून अजून तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही.

बजरंग दलाचे प्रमुख विराज देसाई म्हणाले, हा लव जिहादचा प्रकार असावा. सरवार खान याने यापूर्वी दोन महिलांना विवाहाचे वचन देऊन फसवणूक केली होती. व्यायाम शिकवण्याच्या उद्देशाने महिलांशी जवळीक साधत, त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळे. बदनामीच्या भीतीने प्रतिष्ठित घराण्यातील महिलांनी अद्याप तक्रार नोंद केली नसावी. परंतु आत्ता त्या महिलेने पोलिसात तक्रार नोंदवल्यामुळे सरवर खान याचा खरा चेहरा समोर आला आहे. स्थानिक महिला, मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने असे गैरधंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मत मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केले.

बलात्कारप्रकरणी न्याय हवा

मंगळवारी बजरंग दलाच्या गोवा विभागाने शेकडोंच्या संख्येने हायड्रा जिमवर मोर्चा काढला. सदर जिममध्ये अनैतिक धंदे चालत असून ती व्यायाम शाळा ताबडतोब बंद करा. जिमच्या नावाने सरवर खान असे गैरधंदे करतो, त्याला त्वरित अटक करा, अशी विराज देसाई यांनी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT