Curchorem Shelvan Jetty  Dainik Gomantak
गोवा

Shelvan Jetty: '..गावात जेटी होऊ देणार नाही'! शेळवण-कुडचडेवासीयांचा निर्धार; आमदार काब्राल यांची घेतली भेट

Curchorem Shelvan Jetty: शेळवण गावात ‘रेल्वे ओव्हर ब्रिज’ चे काम होणार होते पण पुलाची रुंदी पाहता मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होणार आहे, याबाबत लोकांना संशय आल्याने त्यांनी या पुलाला विरोध केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: शेळवण-कुडचडे येथे जुवारी नदीत होऊ घातलेल्या दोन जेटींना कुडचडेवासीयांनी तीव्र विरोध केला. त्यांनी आमदार निलेश काब्राल यांची भेट घेऊन ही जेटी कोळसा हाताळण्यासाठी असून आम्हाला ही जेटी कोणत्याही परिस्थितीत नको, अशी मागणी केली. काब्राल यांनीही आपण लोकांबरोबर असल्याचे स्पष्ट करीत जे प्रकल्प लोकांना नको, ते आपल्यालाही नको असे सांगितले.

शेळवण कुडचडे येथे जुवारी नदीवर दोन जेटीचे बांधकाम केवळ कोळसा हाताळण्यासाठी होणार असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त करीत आमच्या गावात ही जेटी होऊ देणार नसल्याचे सांगितले.

या जेटींना पूर्वीपासून विरोध असून आता पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असल्याचे मनोज नाईक यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रीय हरित लावादात गेलो असून या जेटींचे काम चालीस लावण्याचा प्रयत्न होत असल्याने आमदारांनी यात हस्तक्षेप करून हे काम बंद पाडावे अशी मागणी यावेळी नाईक यांनी केली.

शेळवण गावात ‘रेल्वे ओव्हर ब्रिज’ चे काम होणार होते पण पुलाची रुंदी पाहता  मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होणार आहे, याबाबत लोकांना संशय आल्याने   त्यांनी या पुलाला विरोध केला होता. स्थानिक लोकांना या भागात कोळसा कोणत्याही परिस्थितीत नकोय, आमदारांनीही हा प्रकल्प बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सरपंच किस्तोद फर्नांडीस यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई तसेच इतर स्थानिक लोकांनी याविषयी आपले विचार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

शाळा सुटली, पण घर गाठण्यापूर्वीच काळ आला! 6 वीतील चिमुरडीवर अ‍ॅसिड फेकून नराधमानं काढला पळ; महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा

Delhi Fire: दिल्लीत भीषण अग्नितांडव! चार मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी, 9 जणांचा होरपळून मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश VIDEO

Fake Currency Racket Bust: बेळगावात बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश! गोव्यातील तिघांसह बिहारच्या तरुणाला अटक; 500 च्या नोटांचे पाकीट जप्त

SCROLL FOR NEXT