Zuari River Pollution Dainik Gomantak
गोवा

Zuari River: झुवारी नदीचा फाटा बंद होण्याची भीती, खारफुटीची झाडे नष्ट! मलनिस्सारण प्रकल्पासाठी नियम धाब्यावर बसवून काम

Curchorem sewage project: या सांडपाणी प्रकल्पाचे काम होडर येथील झुवारी नदीच्या फाट्याजवळ सर्व नियम धाब्यावर बसवून होत आसल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Sameer Panditrao

केपे: कुडचडे येथे गेल्या दोन वर्षांपासून मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू आहे. या कामासाठी सर्वत्र रस्ते खोदून ठेवल्याने वाहनचालक त्रस्त बनले असून आता या सांडपाणी प्रकल्पाचे काम होडर येथील झुवारी नदीच्या फाट्याजवळ सर्व नियम धाब्यावर बसवून होत आसल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मलनिस्सारण वाहिनीसाठी चेंबर बांधण्याचे काम सुरू असून हे काम संपता संपत नसल्याने रस्त्यांची वाताहत झाली आहे. लोकांनी अनेकवेळा याविषयी तक्रार करूनही लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे मलनिस्सारण वहिनीच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत तर आता मलनिस्सारण प्रकल्पासाठी खाजन शेतजमिनीत हजारो ट्रक माती घालून झुवारी नदीच्या फाट्यातील खारफुटीची झाडे नष्ट करण्यात आली आहेत.

या प्रकल्पासाठी जागा निवडली आहे ती पूर्णपणे चुकीची असून प्रकल्प उभारण्यासाठी मातीचा भराव टाकून जागा करण्यात आल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हा मातीचा भराव टाकून झुवारी नदीचा फाटा अर्धाअधिक बुजविण्यात आला असून खारफुटीचीही मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे व या कामाकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

राज्यात सखल भाग मातीने बुजविण्यास तसेच डोंगरकापणी करण्यास बंदी असताना या प्रकल्पासाठी कोठून माती आणली गेली, असा प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. सध्या राज्यात बेकायदेशीर रेती तसेच चिरे काढण्यास बंदी असताना माती काढता येते का, असा प्रश्नही लोक करीत आहेत.

पर्यावरणाचा ऱ्हास करून प्रकल्प कुणाच्या भल्यासाठी?

या प्रकल्पासाठी खारफुटीची जमीन कोणत्या आधारावर निवडली आहे याचे सरकारने लोकांना उत्तर द्यावे. सरकारला पाहिजे असल्यास बेकायदेशीर कामे चालतात असेच या कामावरून दिसून येते. या प्रकल्पासाठी जो मातीचा भराव टाकला आहे तो पूर्णपणे या झुवारी नदीच्या फाट्यात जाऊन हा फाटा कायमचा बंद होण्याची भीती आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करून हा प्रकल्प कुणाच्या भल्यासाठी उभारला जात आहे, हेच लोकांना कळत नाही. या प्रकल्पाचे काम करणारा कंत्राटदार मनमानी कारभार चालवत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या जागेला भेट देऊन पाहणी करावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT