Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : कुडचडेत युवकाकडे सापडला 38 हजारांचा गांजा

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणानंतर सर्वच तपासयंत्रणा सतर्क झाल्या असून अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अलर्ट मोडवर आल्या आहेत.

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime : सोनाली फोगट मृत्यू प्रकरणानंतर सर्वच तपासयंत्रणा सतर्क झाल्या असून अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अलर्ट मोडवर आल्या आहेत. गोवा सरकारनेही अमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे. रात्री अपरात्री फिरणाऱ्या युवकांची तपासणी चोखपणे केली जात आहे. अशातच कुडचडे पोलिसांनी एका तरुणाकडून तब्बल 38 हजारांचा गांजा जप्त केला आहे.

गोव्यात ठिकठिकाणी निर्जन जागांवर जाऊन तपासणी करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे. याच मोहिमेत कुडचडे पोलिसांनी काल गुरुवारी रात्री रहीम रशीद सय्यद (19) वरकटो दांडो सांगे येथील युवकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. कुडचडे पोलिसांनी सय्यद यांच्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे.

कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रहीम सय्यद हा युवक काल गुरुवारी दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता बेतमड्डी कुडचडे येथे डोंगराळ भागाच्या खाली निर्जन जागेत उभा होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अर्चना गावकर यांनी संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या रहीमची चौकशी केली. त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे त्याच्या स्कूटरची झडती घेण्यात आली. यावेळी सुमारे 223 ग्रॅम अंदाजे 38000 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smuggling: कालेत खैरीच्‍या झाडांची तस्‍करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; तिघांना अटक

Vasco: मासेमारी सुरू होऊनही खारीवाडा जेटीवर सामसूम, 75 टक्के ट्रॉलर्स उभेच; परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षा

Goa Live Updates: कुंडईत छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

Old Goa: 'मास्टर प्लॅन'ची त्‍वरित अंमलबजावणी करा, 'सेव्ह ओल्ड-गोवा' कृती समितीची सरकारकडे मागणी

Quepem: केपे गणेशोत्‍सवाची लॉटरी ठरली 'हिट', काही तासांतच 1.5 लाख तिकिटांची विक्री

SCROLL FOR NEXT