Zilla Panchayat Election : जिल्हा पंचायतीसाठी 19 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामध्ये भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
Goa Zilla Panchayat Election
Goa Zilla Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Zilla Panchayat Election : राज्यातील तीन जिल्हा पंचायत मतदारसंघांत 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले. काल शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामध्ये भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

कुठ्ठाळ्ळीमध्ये भाजपने उमेदवार उभा केलेला नाही. विशेष म्हणजे, सर्वाधिक 10 अर्ज दवर्ली मतदारसंघातून आले आहेत. या अर्जांची छाननी व अर्ज मागे घेतल्यानंतर 8 रोजी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

गोवा राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रेईश-मागूश मतदारसंघात 4, दवर्लीत 10 तर कुठ्ठाळीत 5 जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजप व काँग्रेस पक्षाने मुख्य व बदली असे दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसचे वालेंत बार्बोझा यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. 7 रोजी अर्जांची छाननी, तर 8 रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. याच दिवशी पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

Goa Zilla Panchayat Election
Goa Special Story : गोव्याचा कलम तज्ज्ञ इंजिनिअर

प्रतिष्ठेची निवडणूक

ही पोटनिवडणूक पक्षीय पातळीवर लढविली जात असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने ही लढत गांभीर्याने घेऊन या तिन्ही जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. काँग्रेसनेही आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी या तिन्ही मतदारसंघांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com