Curchorem sex scandal case Dainik Gomantak
गोवा

Soham Naik: कुडचडेतील 'सेक्स स्कँडल' प्रकरणाची व्याप्ती वाढली! 3 तक्रारी दाखल; सोहम नाईकच्या अडचणी वाढल्या

Curchorem sex scandal: सोहम नाईक याच्याविरोधात आणखी एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदविल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे : कुडचडेतील नगरसेवक पुत्र सोहम नाईक याच्याविरोधात आणखी एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदविल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. या प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँचकडे हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी, की कुडचडे येथील नगरसेवक पुत्र सोहम नाईक याच्याविरोधात बलात्कार आणि विनयभंगाच्या तीन तक्रारी कुडचडे पोलिस स्थानकात दाखल झाल्या आहेत.

अचानक या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपविल्याने नाईक याला क्राईम ब्रँचच्या ताब्यात दिले आहे. सोहमला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून आता यापुढे या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच करणार असल्याचे कुडचडे पोलिसांनी सांगितले.

कुडचडेतील या सेक्स स्कॅण्डल प्रकरणाने संपूर्ण गोवा राज्य हादरून गेले असून सोहम याने आपल्या जाळ्यात किती तरुणींना अडकविले होते, याची आणखी माहिती येत्या काही दिवसांत समोर येणार आहे. (सोमवारी) रात्री नाईक याच्याविरोधात दोन अल्पवयीन मुलींनी तक्रार दिली होती, तर एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केल्याने त्याच्याविरोधात आतापर्यंत तीन बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

याप्रकरणी कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांना विचारले असता, त्यांनी आतापर्यंत तीन तक्रारी दाखल केल्या असून या प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँच करणार असल्याने त्यांच्याकडे प्रकरण सोपविले आहे, असे सांगितले.

दुष्कृत्याचे चित्रीकरण करून प्रसारण

खांडीवाडा - कुडचडे येथे सोहम याने या अल्पवयीन मुलीला झुडुपांनी वेढलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तसेच संमतीशिवाय बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, त्याने या संपूर्ण दुष्कृत्याचे आपल्या मोबाईलवर चित्रीकरण (व्हिडिओ) केले आणि तो व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात प्रसारित केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले अन्

अल्पवयीन पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत खांडीवाडा - कुडचडे या परिसरात सोहम नाईक याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि दोन वेगवेगळ्या प्रसंगी म्हणजेच रिवण येथे सोहमने तिचा विनयभंग केला.

कुडचडे पोलिसांना विचारला जाब

कुडचडेतील सेक्स स्कॅण्डल प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे का दिला, हे विचारण्यासाठी मंगळवारी सायंकाळी काही लोकांनी कुडचडे पोलिस ठाण्याकडे धाव घेतली होती. मात्र, काही वेळानंतर हा जमाव परतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अन्य मुलींच्या संपर्क तपशीलासाठी दबाव

१ दुसऱ्या एका तक्रारीत, कुडचडे येथील एका अल्पवयीन पीडित मुलीशी २०२४ ते २०२५ या कालावधीत सोहम नाईक याने ‘इन्स्टाग्राम’द्वारे संपर्क साधला.

२ त्याने तिला आपल्या खासगी अवयवाचा अश्लील फोटो पाठवला आणि जर तिने त्याला तिचा नग्न फोटो पाठवला नाही, तर तिच्या मोठ्या बहिणीसोबतचे त्याचे सध्याचे संबंध तो सार्वजनिकरित्या उघड करेल आणि समाज माध्यमांवर व्हायरल करेल, अशी धमकी दिली.

३ या धमकीमुळे पीडित मुलीने स्वतःचा नग्न (वरच्या अंगाचा) फोटो सोहमला नाईलाजाने पाठविला. याही पुढे जाऊन सोहमने तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि इतर मुलींचे शोषण करण्याच्या उद्देशाने त्यांचे संपर्क तपशील शेअर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

SCROLL FOR NEXT