कुडचडे मतदारसंघात कोट्यवधी रुपये खर्चून विकासकामे सुरू असून तर काही पूर्णत्वास गेली आहेत. पण 20 कोटी रुपये खर्चूनही सुविधा मिळण्याऐवजी लोकांना त्रास मात्र सोसावा लागत असल्याचा प्रत्यय कुडचडे काकोडा पालिकेच्या नव्या इमारतीला लागलेल्या गळतीमुळे येत आहे.
गेल्यावर्षीही हा प्रकार घडला होता, पण कंत्राटदाराला सांगूनही त्याने काहीच न केल्याने यंदा पुन्हा पालिका इमारतीला गळती लागल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.
20 कोटी खर्चून उभारलेली ही इमारत वादाचा विषय ठरली आहे. 2 थिएटर व दुकानांना बोलीदार नसल्याने पालिका बैठकीत हा विषय चर्चेला येतो.
महसूल सोडा, खर्चही गेला पाण्यात !
कोणत्याही नियोजनाशिवाय तळ मजल्यावर दुकाने आणि वरच्या मजल्यावर दोन थिएटर्स उभरण्यात आली होती. अजून त्यांचा लिलाव झालेला नाही. महसूल सोडाच पण त्यावर केलेला खर्चही पाण्यात गेला आहे.
छतालाच गळती लागली असून सर्व पाणी तळमजल्यावर साचल्याने त्यावरुन चालत जाणे धोक्याचे बनले आहे.त्या बाबत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते गेले तीन आठवडे पालिकेत फिरकलेच नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका
वीस कोटींच्या इमारतीला पाच वर्षेंही पूर्ण होण्याआधीच गळती लागल्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.गेल्या चोवीस तासांत केपेत पावसाने कहर केला आहे. पालिका इमारतीची स्थिती पाहून लोकांत संताप पसरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.