Curchorem Goa Sex Scandal Dainik Gomantak
गोवा

'सोहम नाईक' प्रकरणाची व्याप्ती वाढली! प्रौढ व्यक्तींचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती; कुडचडेतील घरावर गुन्हे शाखेचा छापा

Soham Naik Sex Scandal: कुडचडेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी आणखी तीन तक्रारी दाखल झाल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कुडचडेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी आणखी तीन तक्रारी दाखल झाल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने सोहम नाईक याच्या कुडचडेतील निवासस्थानी छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कागदपत्रे जप्त केली असून, यामुळे संशयिताभोवतीचा फास अधिकच घट्ट झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सोहमच्या घराची कसून तपासणी केली. यावेळी त्याचे मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि इतर उपकरणे ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक तपासात या उपकरणांमध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि पीडित मुलींचे फोटो व व्हिडिओ असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व तांत्रिक पुरावे संशयिताविरोधात अत्यंत भक्कम आधार ठरणार आहेत.

प्रकरणाची व्याप्ती वाढली

या प्रकरणात केवळ अल्पवयीन मुलीच नव्हे, तर प्रौढ व्यक्तींचाही समावेश असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या रॅकेटचे धागेदोरे केवळ कुडचडेपुरते मर्यादित नसून त्याचे स्वरूप मोठे असू शकते. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.

ओळख उघड होण्याचा धोका

या प्रकरणातील अनेक मुली अल्पवयीन आहेत. त्यांची ओळख उघड होता कामा नये, याला प्राधान्य दिले जात आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात लोकांची वर्दळ असते. याउलट गुन्हे शाखेतील नियंत्रित वातावरणामुळे गोपनीयता पाळणे सोपे जाते. हे प्रकरण संवेदनशील असून गुन्हे शाखेकडे सोपवल्यामुळे तपासाची गती वाढेल, असेही महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

तपास गुन्हे शाखेकडे

कुडचडे येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे का सोपवला, यावर पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले. या प्रकरणातील संवेदनशीलता आणि पीडितांची ओळख सुरक्षित ठेवणे, ही पोलिसांची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

कला अकादमीतील एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना महासंचालकांनी या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यामागील कारणे सांगितली. ते म्हणाले, की हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचे आहे. अशा प्रकरणात केवळ वरवरचा तपास पुरेसा नाही. गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशीची गरज असते. गुन्हे शाखा अशा प्रकरणात अधिक चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रित करू शकते.

पारदर्शक पद्धतीने कारवाई

संशयित सोहम नाईक याला अटक करण्यात आली असून कारवाई पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. पोलिसांच्या तपासाबाबत कोणीही शंका बाळगू नये, असे आवाहन महासंचालक आलोक कुमार यांनी यावेळी केले.

गेल्या तीन वर्षांपासून कारनामे

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची काही प्रकरणे २०२३ सालची असल्याने सोहम नाईक याचे कारनामे गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT