Curchorem Municipality Dainik Gomantak
गोवा

Curchorem News: कुडचडेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामा

Curchorem Cacora Municipal Council: प्रदीप नाईक यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, ऋचा वस्त या कार्यरत असून त्यांनीही पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

कुडचडेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी अलिखित करारानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदाचा राजीनामा पालिका प्रशासन संचालनालयाकडे सुपूर्द केला.दरम्यान, उपनगराध्यक्षा ऋचा सुभाष वस्त या गेल्या तीन वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असून त्यांनीही पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

अलिखित करारानुसार, पहिल्या वर्षी नगरसेवक विश्वास सावंत, दुसऱ्या वर्षी जस्मिन ब्रागांझा यांनी नगराध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर प्रदीप नाईक यांनी विद्यमान मंडळाच्या कार्यकाळातील तिसरे नगराध्यक्ष म्हणून १४ जुलै, २०२३ रोजी पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा कार्यकाळ यंदा १५ जुलै रोजी पूर्ण झाल्याने त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला.

प्रदीप नाईक म्हणाले,की सदर पद हाताळताना व्यापार परवान्यांच्या विषयात लक्ष घालून कुडचडेत सदर परवान्याविना व्यापार करणाऱ्या अंदाजे ३०० व्यापाऱ्यांशी संपर्क साधला आणि आवश्यक सोपस्कार पूर्ण करून १२० व्यापाऱ्यांना परवाने देण्यात आले. शिवाय त्यांच्याकडून थकबाकीही वसूल केली.

जुन्या व्यापारी संकुलात व जुन्या पालिका इमारतीत असलेल्या व्यापाऱ्यांची त्यांची आस्थापने रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडेच हस्तांतरित करता यावीत, अशी मागणी होती. याविषयीची सर्व माहिती पालिका प्रशासन संचालकांकडे पाठवली आहे. आपल्या कार्यकाळात जी कामे पूर्णत्वास गेली त्यासाठी आमदार नीलेश काब्राल यांचे सहकार्य लाभले. त्यांचाही मी आभारी आहे.
प्रदीप नाईक, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT