Goa Crime News Daini Gomantak
गोवा

Crime News : धमकावून विवाहितेवर बलात्‍कार; पुराव्‍यांअभावी संशयित दोषमुक्‍त

Crime News : कुडचडेतील घटना : विवस्‍त्रावस्‍थेतील फोटो काढल्‍याचा होता आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

मडगाव, आंघोळ करत असतानाचा विवस्‍त्रावस्‍थेतील फोटो दाखवून कुडचडे येथील एका विवाहित महिलेला धमकावून सतत तीन वर्षे तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍याच्‍या आरोपाखाली अटक केलेल्‍या दीपक धुरी (कुडचडे) याच्‍याविरोधातील आरोप अभियोग पक्ष सिद्ध करू न शकल्‍याने दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी त्‍याची निर्दोष मुक्‍तता केली.

२०१४ मध्‍ये दीपक व त्‍या महिलेला एका क्रशरजवळ पाहिल्‍यावर कुंकळ्‍ळी पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी पोलिस स्‍थानकावर आणले होते. या घटनेनंतर सात दिवसांनी त्‍या महिलेने पोलिसांत बलात्‍काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात संशयिताची बाजू ॲड. सुहास वेळीप यांनी मांडली.

ॲड. सुहास वेळीप यांनी युक्तिवाद करताना, जर संशयित या महिलेवर धमकावून बळजबरी करत होता, तर ज्‍या दिवशी कुंकळ्‍ळी पोलिसांनी त्‍यांना चौकशीसाठी ताब्‍यात घेतले, त्‍याच दिवशी तिने पोलिसांकडे संशयिताच्‍या विरोधात तक्रार का केली नाही? असा सवाल केला. ज्‍या कथित फोटोवरून त्‍या महिलेला धमकावण्‍यात आले असा दावा करण्‍यात आला, तो फोटो पोलिसांनी पुरावा म्‍हणून न्‍यायालयासमोर आणला नाही.

तसेच ज्‍या बाथरूममध्ये आंघोळ करताना हा फोटो काढला गेला असे महिलेचे म्‍हणणे आहे, त्‍या बाथरूममध्ये आंघोळ करताना खरेच असा फोटो काढला जाऊ शकतो का याचाही कुठलाही पुरावा पोलिस न्‍यायालयासमोर आणू शकले नाहीत. हे मुद्दे ग्राह्य धरून तसेच सबळ पुराव्‍यांअभावी न्‍यायालयाने संशयित दीपक धुरी याला निर्दोष मुक्त केले.

काय आहे प्रकरण?

१८ ऑगस्‍ट २०१४ रोजी त्‍या विवाहित महिलेने कुडचडे पोलिसांत दीपक धुरी याच्‍याविरोधात तक्रार दिली होती. ही तक्रार देण्‍याच्‍या तीन वर्षे आधी संशयिताने मला आपले वडील आजारी असल्‍याचे सांगून बोलावून घेतले. नंतर कोलवा येथे एका हॉटेलमध्‍ये नेऊन ‘तुझा विवस्‍त्रावस्‍थेतील फोटो माझ्‍याकडे आहे. माझी मागणी मान्‍य न केल्‍यास तो फोटो व्‍हायरल करणार’ अशी धमकी देऊन बलात्‍कार केला.

त्‍यानंतर कित्‍येकदा अशाच प्रकारे त्‍याने माझ्‍यावर अत्‍याचार केला, असे तिने तक्रारीत म्‍हटले होते. संशयित आमचा शेजारी असून मी आपल्‍या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना त्‍याने बाहेरून माझा विवस्‍त्रावस्‍थेतील फोटो काढला, असेही या तक्रारीत नमूद करण्‍यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach Assault Case: बंगळुरुच्या पर्यटकाला अमानुष मारहाण, कळंगुटमधील 'त्या' शॅकचा परवाना निलंबित; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा

Chandra Gochar 2026: एप्रिल महिन्यात चंद्राची अद्भुत चाल! 19 वेळा नक्षत्र बदलून 'या' 7 राशींना करणार मालामाल; नशिबाचीही मिळणार साथ

Ram Navami Wishes in Marathi: गुरुवारी आली रामनवमी, सुवर्णयोगाची पर्वणी! राम नवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT