Curchorem stream pollution Dainik Gomantak
गोवा

Curchorem: आता कुडचडेतील ओहोळात मृत मासे, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याच्या परिणामाचा स्थानिकांचा आरोप

Curchorem Dead Fish: कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून सोडण्यात येणारे सांडपाणी जवळच्या नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून सोडण्यात येणारे सांडपाणी जवळच्या नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हे पाणी करमलीवाडा परिसरातून वाहणाऱ्या ओहोळात मिसळल्याने मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.

कुडचडेचे माजी नगरसेवक पुष्कल सावंत देसाई यांनी या ठिकाणी जाऊन याविषयी कचरा प्रक्रिया प्रकल्पातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. गेल्या काही दिवसांपासून ओहोळातील पाण्याचा रंग बदलल्याचे तसेच दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर ओहोळाच्या विविध ठिकाणी मृत मासे तरंगताना दिसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पाणी सावंत देसाई यांनी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यापूर्वीही दोनवेळा प्रकार उघडकीस: पणजी येथील मळा तलावात ११ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याची घटना घडली होती.

तलावाच्या जलाशयात हजारोहून अधिक मृत मासे तरंगताना आढळले होते. तलावाच्या आजूबाजूच्या वस्तीतील सांडपाणी जलाशयात मिसळल्याने ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी झाली आणि माशांचा मृत्यू झाला. या घटनेची गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेत जनहित याचिका दाखल केली होती.

त्यानंतर महापालिकेला तलावात सांडपाणी सोडणारे अनधिकृत मार्ग बंद करण्याची कारवाई करावी लागली. शिवाय कांपाल येथील तलावातही मागील महिन्यात काही प्रमाणात मृत मासे आढळले होते.

चौकशीची मागणी

या घटनेमुळे पर्यावरणीय हानी होत असून परिसरातील जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कुडचडे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी करावी तसेच संबंधित खात्याने तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन मासे मृत्यूचे नेमके कारण शोधावे तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी करावी, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT