Cuncolim Palika  Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Municipality : या आठ नगरसेवकांनी दाखल केलाय कुंकळ्ळीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim Municipality : कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव समर्थक सात आणि एक अपक्ष नगरसेवक मिळून आठजणांनी अविश्र्वास ठराव आणला आहे. नगराध्यक्ष नाईक हे इतर नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप या आठ नगरसेवकांनी केला आहे.

युरी समर्थक नगरसेवक लेंड्री मास्कारेन्हस, रेमंड डिसोझा, जॉन डायस, अँथनी वाझ, जमिरा पिरीस, रेखा फर्नांडिस, गौरी शेटकर, अपक्ष नगरसेवक उदेश देसाई यांनी या ठरावावर सह्या केल्या आहेत.

कुंकळ्ळी पालिका मंडळात 14 नगरसेवक असून यातील आठजण नगराध्यक्षांच्या विरोधात गेल्यामुळे लक्ष्मण नाईक यांची खुर्ची धोक्यात आली आहे. गेल्या 27 महिन्यांपासून लक्ष्मण नाईक हे नगराध्यक्ष पदावर विराजमान आहेत. यापूर्वीही लक्ष्मण नाईक यांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी नगरसेवकांनी अनेक प्रयत्न केले होते.

यापूर्वीही आठ नगरसेवकांनी असाच अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र, नंतर आमदार युरी आलेमाव यांनी हस्तक्षेप करून रेमंड डिसोझा यांना माघार घेण्यास भाग पाडले होते.

राजीनामा देणार नाही : नाईक

युरी समर्थक नगरसेवकांचे म्हणणे आहे की, नाईक यांना दोन वर्षांसाठी नगराध्यक्ष पद बहाल केले होते. दोन वर्षांनंतर नगराध्यक्षपद इतर नगरसेवकांना देण्याचे ठरले होते. मात्र, युरी आलेमाव यांनी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांना राजीनामा देण्यास केलेली विनंती त्यांनी मान्य न केल्याने युरी समर्थक नगरसेवकांनी आणखी एका नगरसेवकाच्या सहयोगाने आणलेला अविश्वास ठराव सफल होतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांनी मात्र राजीनामा न देता अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याचे ठरविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT