Goa’s Unemployment & Foreign Job Scams Dainik Gomantak
गोवा

Cuncolim NIT: 'जागा दिल्या पण, नोकऱ्या नाहीत'! कुंकळ्ळी ‘एनआयटी’वरती आपचा आरोप; पैसे मागितल्याची ऐकवली Audio Clip

Cuncolim nit jobs issue: कुंकळ्ळीत एनआयटी उभारण्यासाठी स्थानिकांनी आपली वडिलोपार्जित जमीन देऊनही कुंकळ्ळीतील स्थानिकांना या नामांकित शिक्षण संस्थेत नोकऱ्या मिळत नाहीत.

Sameer Panditrao

मडगाव: कुंकळ्ळीत एनआयटी उभारण्यासाठी स्थानिकांनी आपली वडिलोपार्जित जमीन देऊनही कुंकळ्ळीतील स्थानिकांना या नामांकित शिक्षण संस्थेत नोकऱ्या मिळत नाहीत. सुरक्षारक्षक (सिक्युरीटी), स्वच्छता कर्मचारी या सारख्या नोकऱ्यांसाठी स्थानिकांना सुद्धा पैसे मोजावे लागत असल्याचे ‘आप’चे गोवा राज्य संयुक्त सचिव प्रशांत नाईक आणि युवा नेते नेश कुतिन्हो यांनी उघडकीस आणले आहे.

याप्रकरणी सखोल चौकशी करावी तसेच स्थानिकांना एनआयटी संस्थेत चांगल्या नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी ही या दोघांनी केली. या आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एक ऑडिओ क्लिप जोडली आहे. त्यात नोकरी देण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे स्पष्टपणे म्हणताना ऐकू येत आहे.

‘एनआयटी’ साठी भूसंपादन करताना जमीन दिलेले तसेच स्थानिकांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले जाईल. माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. मनोहर पर्रीकर यांनीही तसा शब्द कुंकळ्ळीवासीयांना दिला होता. प्रत्यक्षात कुंकळ्ळीवासीयांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या नाहीतच वरून सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी व अन्य तत्सम नोकऱ्यांसाठी ही १० ते २० हजार रुपये किंवा एक पगार मागितला जात असल्याचे नाईक यांनी सांगितले.

‘एनआयटी’त असलेले गोव्याबाहेरील याठिकाणी प्रमुख म्हणून वावरतात व ते स्थानिकांकडून ही सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यासाठी पैसे मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंकळ्ळीवासीयांनी ‘एनआयटी’साठी जमीन देऊन ही काहीच फायदा झाला नाही. असे नमूद करीत याला कोण जबाबदार असा प्रश्‍नही नाईक यांनी उपस्थित केला.

‘आप’चे युवा नेते नेश कुतिन्हो म्हणाले की, एनआयटीत प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या बाहेरील व्यक्तींनी कुंकळ्ळीतील बेरोजगार युवकांची थट्टा चालवली आहे. रक्षक, स्वच्छता कर्मचारी म्हणून नियुक्तीसाठी पैसे मागितले जात असल्याचे पुरावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India-America Relations: 'भारतासोबतचे संबंध खराब करु नका...'! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ नितीवरुन अमेरिकन खासदाराने फटकारले

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

Beach Sports Tourism Hub: आता ऑस्ट्रेलिया, ब्राझीलला जायला नको, गोवाच बनणार 'बीच स्पोर्ट्स टुरिझम हब'! सरकारची नवी योजना

Barabanki Accident: चालत्या बसवर कोसळलं झाड, चालकासह 5 प्रवाशांचा मृत्यू; लोकांनी खिडकीतून उडी मारून वाचवले प्राण Watch Video

Goa Assembly Live Updates: गोविंद गावडे यांनी विधानसभेत सादर केला पोवाडा; मर्दनगडाच्या संरक्षणावर खासगी ठराव

SCROLL FOR NEXT