Goa Assembly Live Updates: उबरसारख्या कॅब अ‍ॅग्रीगेटर्सना कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही - मुख्यमंत्री

Goa Assembly Latest Updates Marathi: जाणून घ्या गोव्यातील पावसाळी अधिवेशनाच्या ठळक घडामोडी आणि इतर राजकीय बातम्या.
Goa Assembly Live Updates
Goa Assembly Live UpdatesDainik Gomantak

Goa Assembly: उबरसारख्या कॅब अ‍ॅग्रीगेटर्सना कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, राज्यात उबरसारख्या कोणत्याही कॅब अ‍ॅग्रीगेटरला सरकारकडून अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. विधानसभेत आमदार वेंझी वेगास यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी कोल्वा येथे नोंदविण्यात आलेल्या पोलिस तक्रारीचा हवाला देत, काही कॅब सेवा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्र्यांन उत्तर दिलं.

Bhatlem: महापौरांकडून तातडीने रस्ता दुरुस्ती; भाटलेतील राम मंदिराजवळील प्रवाशांचा दिलासा

महापौर रोहित मोन्सेरात यांना समस्या सांगितल्यानंतर भाटले येथील राम मंदिराजवळील रस्त्याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली. स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी समस्या महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली.

Goa Assembly : म्हादई पाणीप्रश्नी विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर

म्हादईचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटककडून पाणी वळवण्याचा प्रकार सुरू असल्याचा मुद्दा विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com