Cuncolim News Dainik Gomantak
गोवा

Cuncolim News : कुंकळ्ळी येथे शनिवारी जलाभिषेकाचा कार्यक्रम; मुख्‍यमंत्र्यांची खास उपस्‍थिती असणार

16 महानायकांना अभिवादन ; कुंकळ्ळीच्या या इतिहासाची ज्योत तेवत ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim : श्री शांतादुर्गा सेवा समिती गेल्या पाच वर्षांपासून 15 जुलै रोजी जलाभिषेकाचा कार्यक्रम करून कुंकळ्ळीतील ज्वलंत इतिहास कुंकळ्ळी परिसरातील इतर गावांत पोहोचविण्याचे काम करत आहे. यामुळे 16 महानायकांच्या स्मारकाला जलाभिषेक करण्याचे भाग्य कुंकळ्ळीच्याच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना लाभले.

यंदाही शनिवार, 15 रोजी दुपारी 3:30 वाजता जलाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्‍हा मुख्‍यमंत्र्यांची खास उपस्‍थिती असणार आहे.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. केदार फाळके (मध्ययुगीन भारताचे इतिहासकार) यांचे ‘श्री शिवराज्याभिषेक हिंदू अस्मितेचा आविष्कार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

१६व्या शतकात कुंकळ्ळीतील गावकऱ्यांनी जो लढा दिला त्याला अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून त्या १६ महानायकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री डॉ". प्रमोद सावंत यांनी घेतला.

कुंकळ्ळीकरांची तसेच गोव्यातील इतिहासकारांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण करून मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र ठरले. याचे औचित्य साधून शांतादुर्गा सेवा समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

समितीचे अध्यक्ष संजय शेटकर यांनी मुख्यमंत्र्यांना जलाभिषेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले. मुख्यमंत्री सावंत यांनी शांतादुर्गा सेवा समितीने सुरू केलेल्या जलाभिषेक कार्यक्रमाचे कौतुक केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्या दिल्या.

गोवेकरांनी मानवंदना द्यावी

16 महानायकांच्या स्मारकाला जलाभिषेक करण्याचे भाग्य कुंकळ्ळीच्याच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना लाभले आहे. कुंकळ्ळीच्या या इतिहासाची ज्योत तेवत ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे. यावेळी सर्व धर्माभिमानी गोवेकरांनी सहभागी होऊन त्यांना मानवंदना देण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष संजय शेटकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT