Cuncolim wall collapse death Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: दुर्दैवी! भिंत कोसळून 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू; कुंकळ्ळीतील दु:खद घटना

Cuncolim wall collapse death: कुंकळ्ळी येथे एका घराची भिंत पाडण्याचे काम चालू असताना ती कोसळून चोवीस वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कुंकळ्ळी येथे एका घराची भिंत पाडण्याचे काम चालू असताना ती कोसळून चोवीस वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद साबिर असे या कामगाराचे नाव असून तो मूळ बिहार राज्यातील होता. रोजंदारीवर तो काम करीत होता, अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली.

काल बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नागेलो कुंकळ्ळी येथे ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अन्य कामगारांसमवेत क्लोतून आल्मेदा यांच्या जुन्या घराची भिंत पाडण्याचे काम करीत होता.

यावेळी अचानक ती भिंत कोसळून त्याखाली चिरडला गेल्याने मोहम्मद हा गंभीर जखमी झाला. अन्य कामगारांनी त्याला मागाहून बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहेत. मयताच्या बिहार येथील कुटुंबियांना पोलिसांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे. ते गोव्यात आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाईल. मृतदेह सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT