Two Municipal Employees Arrested Dainik Gomantak
गोवा

Cuchelim Comunidade Land Scam: पालिका कर्मचाऱ्यासह दोघे गजाआड; कुचेली कोमुनिदाद जमीन घोटाळ्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Two Municipal Employees Arrested: म्हापसा पोलिसांनी एका पालिका कर्मचाऱ्यासह कोमुनिदाद सदस्य मिळून एकूण सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: कुचेली कोमुनिदाद मालकीच्या जागेत भूखंड पाडून परस्पर त्यांची विक्री केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका पालिका कर्मचाऱ्यासह कोमुनिदाद सदस्य मिळून एकूण सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला.

याप्रकरणी रमेश राव (कुचेली) आणि शकील शेख (रा. करासवाडा) या दोघांना बुधवारी (ता.२०) सायंकाळी अटक केली. एकूण ३८.४९ लाखांचा हा फसवणुकीचा प्रकार आहे. अटक (Arrested) करण्यात आलेला रमेश राव हा म्हापसा पालिकेत पर्यवेक्षक म्हणून कामाला आहे. खडपावाडा-कुचेली येथील सरकारने (Government) संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण करून उभारलेली ३६ घरे १२ नोव्हेंबरला जमीनदोस्त केली होती.

प्रत्‍येकाकडून 5 ते 9 लाख रुपये उकळले

100 ते 150 चौ. मी. भूखंडासाठी या लोकांकडून सूत्रधारांनी सुमारे 5 ते 9 लाख रुपये घेतल्याचा दावा वरील जागेत घर बांधून वास्तव्य करणाऱ्यांनी लोकांनी केला आहे. जागा खरेदी केल्यानंतर, भाटकाराकडे तसेच संबंधितांकडे सर्व सोपस्कार कायदेशीर करून जागा मिळवून देण्याचे आश्‍‍वासनही संबंधित भोगवटादारांना काही ठगसेनांनी दिले होते.

आता बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्यांना जागा खाली करण्याच्‍या नोटिसा काढल्याने, या लोकांना भूखंड पाडून जमिनींचा आर्थिक व्यवहार केलेल्यांचे दाबे सध्या दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Price: धनतेरसपूर्वी सोन्याचा नवा रेकॉर्ड! भाव 1 लाख 27 हजारांच्या पार; चांदीनंही दाखवली पुन्हा चमक

Kuldeep Yadav: टीम इंडियाचा नवा विकेट किंग! कुलदीप बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा 'नंबर 1' गोलंदाज VIDEO

Porvorim traffic jam: प्रयोग फसला, ट्रायल रनमध्येच उडाला वाहतुकीचा फज्जा; पर्वरी तुंबली

घरदुरुस्ती, विभाजन प्रक्रिया सोपी होणार; 'माझे घर' योजनेमुळे मयेवासीयांना मिळणार घरांचा मालकी हक्क

VIDEO: ट्रम्प यांचे भाषण सुरु असतानाच इस्रायली संसदेत राडा, 'पॅलेस्टाईनला मान्यता द्या'चे झळकले पोस्टर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT