Investment Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud: मोबाईल लिंकवर पैसे पाठवले, नंबर झाला 'नॉट रिचेबल'; क्रिप्टोतून जादा परताव्याच्या आमिषाने 3.35 लाखांचा गंडा

Goa Scam: जादा परतावा देण्याच्या आमिषावरून अजूनही लोक फसत असून शिरोडा भागात गुप्ता नामक एका कुटुंबाला ३ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: जादा परतावा देण्याच्या आमिषावरून अजूनही लोक फसत असून शिरोडा भागात गुप्ता नामक एका कुटुंबाला ३ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुप्ता कुटुंबीयांनी फोंडा पोलिसांत अज्ञात भामट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करीत आहेत.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोडा येथील गुप्ता नामक एका कुटुंबाच्या मोबाईलवर जान्हवी व राजेश नामक दोघा व्यक्तींनी संपर्क साधून आपण कॅपिटल वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी असून आमच्या कंपनीत क्रिप्टो मार्केटशी संबंधित पैसे गुंतवाल तर जादा परतावा मिळेल अशी बतावणी केली.

या बतावणीला गुप्ता कुटुंबीय भुलले आणि त्यांनी त्या दोघा भामट्यांनी दिलेल्या मोबाईल लिंकवर एकूण ३ लाख ९० हजार रुपये गुंतवले. हा व्यवहार गेल्या २९ मे २०२४ ते १५ जुलै २०२४ या काळात झाला. सुरवातीला गुप्ता कुटुंबाला ५५ हजार रुपयांचा बोनस देण्यात आला. त्यामुळे गुप्ता कुटुंबाने थोडे थोडे करून एकूण ३ लाख ९० हजार रुपये गुंतवले.

मात्र, त्यानंतर कोणताच संदेश नाही की फोन नाही, असा प्रकार झाल्यामुळे गुप्ता कुटुंबीयांनी त्या भामट्यांनी दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल नॉट रिचेबल येऊ लागला आणि नंतर तर दिलेला क्रमांकच बंद पडला.

शेवटी वाट पाहून आपण पूर्णपणे फसलो गेल्याचे पाहून गुप्ता यांनी फोंडा पोलिसांत त्या दोन भामट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. फोंडा पोलिसांनी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच संपर्क होऊ न शकल्याने ती दोन्ही नावे बनावट असल्याचे सिद्ध झाले असून फोंडा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

SCROLL FOR NEXT