Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कंपनीत, बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 4.82 कोटींचा गंडा, दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Goa Online Scam: तक्रारीनुसार, प्रथम तक्रारदाराने ७.६६ लाख आणि ४.१० लाख रुपये गुंतवणूक केली होती. त्याचा मोबदला म्हणून ६.९ लाख आणि १.२३ लाख रुपये तक्रारदाराला दिले होते.

Sameer Panditrao

मडगाव: क्रिप्टो करन्सी आणि इतर प्रकारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून कुडचडे येथील एका कुटुंबाला ४.८२ कोटींचा गंडा घालण्याच्‍या आरोपाखाली आर्थिक गुन्हा विभागाने गोवा गेम्स ऑनलाईन सर्विसेस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी यांच्या विरोधात मडगाव येथील दक्षिण गोवा सत्र न्यायालयात आज आरोपपत्र दाखल केले आहे.

हे आरोपपत्र १,०६४ पानी असून त्यात २४ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मे रोजी होणार आहे. या प्रकरणी कुडचडे येथील रूपेश रोहीदास बांदेकर यांनी ईओसीत तक्रार दाखल केली.

त्यात त्यांनी संशयित सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी या दोघांनी गोवा गेम्स ऑनलाईन सर्विसेस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक या नात्याने तक्रारदार तसेच त्याच्या कुटुंबीयांना १५ जुलै २०१७ ते १० ऑक्टोबर २०१७ दरम्यान वरील कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते, असे म्‍हटले होते.

तक्रारीनुसार, प्रथम तक्रारदाराने ७.६६ लाख आणि ४.१० लाख रुपये गुंतवणूक केली होती. त्याचा मोबदला म्हणून ६.९ लाख आणि १.२३ लाख रुपये तक्रारदाराला दिले होते. त्यानंतर १९.०६ लाख, ३.६३ लाख रुपये मिळून २२.६९ लाख रुपये गोवा गेम्स ऑनलाईन सर्विसेस प्रा. लि. कंपनीत गुंतवणूक केली.

त्यानंतर तक्रारदाराला cryptocoinshopping.com मध्ये क्रिप्टो चलनमध्ये ५.७५५८३२७ बिटकॉन्स गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, या गुंतवणूक संदर्भात काहीच मोबदला दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराला सध्याच्या बाजार भावानुसार, ४.६ कोटी रुपये फसवणूक झाली.

एकूण गुंतवणुकीची रक्कम ४ कोटी ८२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा तक्रारीत केला. निरीक्षक राजाशद शेख यांनी वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ईओसीने संशयित सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी या दोघांना अटक केली होती. दरम्यान, आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मे रोजी होणार आहे.

अजयला जामीन, भौमिकचा अर्ज फेटाळला

अजय दोडामणी याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. तर, सुकांता भौमिक याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर भौमिक याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT