Goa Petrol Diesel Price Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Price|कच्चे तेल पुन्हा $4 ने महागले, जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर किती वाढले?

ओपेकने आपला पुरवठा कमी केला आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्या आणि देशांतर्गत किरकोळ बाजारात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणाऱ्या सरकारी तेल कंपन्या भावही वाढवत आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा: चीन-अमेरिकेसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये इंधनाचा वापर कमी झाल्यामुळे ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) ने उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठा आणि किमतीवरही दिसू लागला. गेल्या 24 तासांत क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 4 डॉलरने महागली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले.

(Crude Oil Rises By $4 Again, Know How Fuel Prices Soared in goa)

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि गोव्यात पेट्रोल 97.39 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.95 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडच्या किंमतीत मोठी उसळी आली आणि त्याची किंमत प्रति बॅरल $ 104.7 वर पोहोचली. त्याचप्रमाणे, WTI ची किंमत देखील सुमारे $ 3.5 ने वाढून $ 96.77 प्रति बॅरल झाली.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.39

  • Panjim ₹ 97.39

  • South Goa ₹ 97.11


Goa Diesel Price

  • North Goa ₹ 89.95

  • Panjim ₹ 89.95

  • South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT