Crowds in bicholim for Vat Purnima Festival Dainik Gomantak
गोवा

वटपौर्णिमेच्या साहित्यासाठी डिचोलीत गर्दी

खरेदी जोरात ; वडाभोवती फेऱ्यांसाठी सुवासिनी सज्ज

दैनिक गोमन्तक

डिचोली : वटपौर्णिमेच्या पूर्वदिनी आज (सोमवारी) या व्रतासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी डिचोली बाजारात सुवासिनींची गर्दी उसळली होती. त्यातच दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने गर्दीत भर पडली.

परंपरेप्रमाणे वडाभोवती सात फेरे मारण्यासाठी डिचोलीत सुवासिनी सज्ज झाल्या आहेत. पतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधाण देणारे व्रत म्हणजे वटपौर्णिमा. उद्या मंगळवारी वटपौर्णिमा साजरी होत असल्याने सर्वत्र विशेष करून सुवासिनींमध्ये उत्साह संचारला आहे.

खरेदीला जोर

कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे वटपौर्णिमेच्या बाजारावर निर्बंध आले होते. यंदा वटपौर्णिमेच्या साहित्याने बाजार फुलला आहे. अननस, आंबे, फणस, केळी आदी फळांसह वडाच्या फांद्या, वडाची पाने, अणशीचे दोर आदी साहित्य डिचोली बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहे.

हे साहित्य खरेदी करण्यासाठी आज दिवसभर बाजारात सुवासिनींची वर्दळ सुरू होती. सायंकाळी तर बाजारात गर्दी उसळली होती. त्यातच आज पावसाने कृपा केल्याने खरेदी मोठ्या उत्साहात खरेदी सुरू होती.

फणस, आंबे आदी काही फळे महाग असली तरी त्याची पर्वा न करता सुवासिनी साहित्य खरेदी करताना दिसून येत होत्या. आज दिवसभर बाजारात वटपौर्णिमेच्या साहित्याला चांगली मागणी होती, असे विक्रेत्या सुभद्रा गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

SCROLL FOR NEXT