Crowds at market in ponda on occasion of Diwali Dainik Gomantak
गोवा

दिवाळीनिमित्त दिव्यांनी सजली फोंडा बाजारपेठ

फोंडा बाजारपेठेत रंगीबेरंगी आकाशकंदील तसेच चिकणमातीपासून तयार केलेल्या पणत्या दाखल झाल्या आहेत

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा तालुक्यातील ग्रामीण भागात दिवाळी (Diwali) सणाच्या तयारीसाठी लोक आतापासूनच तयारीला लागले आहेत. ठिकठिकाणचे युवक नरकासुर प्रतिमा बनवण्यात गुंतले आहेत. फोंडा व इतर ग्रामीण भागांतील बाजारपेठेत दिवाळी सणाला लागणारे साहित्य दाखल झाले आहे.

फोंडा बाजारपेठेत (Market) रंगीबेरंगी आकाशकंदील तसेच चिकणमातीपासून तयार केलेल्या पणत्या दाखल झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी संपलेली नाही. मात्र, यंदा लोकांमध्ये दिवाळी सणाचा (Diwali Festival) उत्साह थोडा वाढलेला दिसत आहे. सध्या बाजारपेठेत आकाशकंदिलाबरोबर रंगीत पताका, हार, पूजा साहित्य, पोहे आदी उपलब्ध झाले आहेत. कागदापासून नरकासुराचे मुखवटे बनवण्याच्या तयारीला युवक लागले आहेत. काही युवकांनी लोखंडी किंवा पत्र्याच्या आकाशकंदिलाऐवजी बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील वापरणार असल्याचे सांगितले.

स्वयंसाहाय्‍य गटांकडून खाद्यपदार्थ निर्मिती

गृहिणींकडून दिवाळी सणासाठी लागणारे विविध खाद्यपदार्थ आधीच तयार करून ठेवले जातात. त्यासाठी गृहिणी या कामात गुंतल्याचे चित्र घराघरांत पाहायला मिळते. काही स्वयंसाहाय्‍य महिला गट एकत्र येऊन दिवाळी सणासाठी लागणारे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून ते विक्रीसाठी बाजारपेठेत सज्ज ठेवले आहेत. यंदा बाजारपेठेत गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारपेठेत येणाऱ्या लोकांनी सरकारच्या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT