Goa Lokotsav  Dainik Gomantak
गोवा

Goa Lokotsav 2023: लोकोत्सवात खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर झुंबड

गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

लोकोत्सवातील विविध हस्तकला स्टॉल्स, हातमागावरील कपड्यांचे स्टॉल, राजस्थानी पादत्राणे, फॅन्सी दागिने आदी स्टॉल्सवर खरेदीसाठी रविवारी लोकांची झुंबड उडाली होती. खाद्यपदार्थांचा स्टॉल्सवर खवय्ये तुटून पडले होते. खाद्यपदार्थांच्या दालनात प्रवेश करणेही कठीण होऊन बसले होते.

दर्यासंगमावरील रंगमंचावर विविध राज्यांतील लोककलांचा आनंद लुटण्यासाठी रविवारीही रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

गेले दोन दिवस हस्तकला, कोल्हापुरी चप्पल, राजस्थानी जुती, वस्त्रप्रावरणे, क्रॉकरी, पर्स, फॅन्सी दागिने यांच्या स्टॉल्सवर भरपूर उलाढाल झाल्याने स्टॉलधारक समाधानी दिसले. शनिवारच्या तुलनेत रविवारी लोकोत्सवाला लोकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे कला अकादमीसमोरील रस्त्यावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली.

राजस्थानी तिरंदाजी कला-

येथील एका स्टॉलवर राजस्थानी पद्धतीच्या तिरंदाजीच्या वस्तू, भाले उपलब्ध आहेत. बांबूपासून बनविलेले वेगवेगळ्या आकाराचे धनुष्य-बाण आहेत. त्यांच्या किमती दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. रतनलाल आणि सावरीबेन हे वयोवृद्ध हस्तकारागीर यांचा हा स्टॉल आहे.

त्यांच्या कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. उत्तर प्रदेशातील अब्दुल समद यांची वैविध्यपूर्ण क्रॉकरी अनेकांनी पसंत केली. कप, मग, किटल्या अशा बऱ्याच वस्तू तेथे विक्रीला आहेत. दीडशे रुपयांपासून दोन हजारांपर्यंत त्यांच्या किमती आहेत.

गलिच्छ स्वच्छतागृहांमुळे दुर्गंधी-

लोकोत्सवासाठी येणाऱ्या लोकांसाठी कला अकादमीतील स्वच्छतागृहे खुली केली आहेत. मात्र, शनिवारपासून या स्वच्छतागृहांची साफसफाई केली नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. या परिसरात सॅनिटरी पॅडस, पॅम्पर्स, टिश्यू पेपर्स अस्ताव्यस्त विखुरलेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT