पणजी: वीज खात्याकडे कोट्यवधींची वीज बिलांची थकबाकी प्रलंबित आहेत त्यात सरकारी खात्यांचाही समावेश आहे. सरकारी खात्याच्या विविध कार्यालयाची कोटींची वीज बिले थकीत आहेत त्यामध्ये सर्वाधिक सार्वजनिक बांधकाम खात्यातील आहेत. 50 हजारापेक्षा अधिक थकीत वीज बिले असलेली 657 सरकारी कार्यालये असून त्याची ही थकबाकी २०० कोटीच्या घरात आहे. याव्यतिरिक्त 50 हजारापेक्षा कमी थकबाकी वीज बिले असलेली सरकारी कार्यालये आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध विभागाची अधिक वीज बिले थकीत आहेत. थकीत असलेली बिले सुमारे 180 कोटी आहेत. बांधकाम खात्याची 24 कार्यालये आहेत. त्याची थकबाकी 166 कोटी आहे. फोंडा ओपा प्रकल्पाचे थकीत वीज बिल 46 कोटींचे आहे. तसेच या खात्याच्या विभाग 17 चे 29 कोटी तर विभाग 12 चे 26 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याव्यतिरिक्त ज्या इतर खात्यांची वीज बिले थकीत आहेत. त्यामध्ये जलस्रोत खाते, पोलिस, आरोग्य, क्रीडा या खात्यांचा समावेश आहे. वीज खात्याच्या काही कार्यालयाची बिले थकीत आहेत, त्याची रक्कम 6 लाख रुपये आहे. गोमेकॉ, सुपर स्पेशिलिटी, दोन जिल्हा इस्पितळे मिळून सुमारे दीड कोटीची बिले थकीत आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे 74 लाखांचे तर लष्कर गॅरीसन गॅरेजची 73 लाखांची वीज बिले प्रलंबित आहेत.
‘ओटीएस’ चा लाभ नाही
क्रीडा खात्याच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या स्टेडियमच्यी 50 लाख तर काही नगरपालिका तसेच पणजी महापालिका, पंचायती मिळून लाखापेक्षा अधिक बिले थकीत आहेत. सरकारी खात्याला ओटीएसचा लाभ नसतो, मात्र त्यांची ही थकीत रक्कम एका खात्याकडून दुसऱ्या खात्याकडे अंतर्गत व्यवहार केला जातो. मात्र वीज खात्याची ही कोट्यवधीची बिले थकीत राहिल्याने खात्याचा वीज बिले वसुली ही अहवाल हा नकारात्मक दिसून येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.