Goa unseasonal rain May 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa: 'अवकाळी'चा फटका! गोव्यात 90 हजार हेक्टर लागवडीखालील शेतीचे नुकसान; भातशेती, भाजीपाला नष्ट

Crop loss in Goa: मे महिन्यात अवकाळी पावसाने राज्यात सर्वत्र हजेरी लावली. या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Sameer Panditrao

पणजी: मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील चार तालुक्यांतील ९० हजार हेक्टर लागवडीखालील शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने राज्यात सर्वत्र हजेरी लावली. या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात सांगे, केपे, धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लागवडीखालील सुमारे ९० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे ३२३ शेतकऱ्यांची शेती प्रभावित झाली आहे. भात रोपवाटिका, भाजीपाला आणि इतर हंगामी शेती उत्पादन या पावसात नष्ट झाले आहे.

कृषी विभागाने प्राथमिक नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण केले आहे आणि प्रतिहेक्टर ४०,००० रुपये भरपाई दिली जाईल, असे जाहीर केले आहे. योग्य पडताळणीनंतर शेतकऱ्यांना थेट रोख स्वरूपात मदत दिली जाणार आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आणखी नुकसान झाल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून मदत वेळेत वाढवता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

SCROLL FOR NEXT