Goa News |
Goa News | Dainik Gomantak
गोवा

Goa News: पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत रानगव्याने मांडला उच्छाद

दैनिक गोमन्तक

Goa News: इब्रामपुरात गवे आणि इतर जंगली प्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. या नुकसानीची वनखात्याने आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अर्थसाहाय्य करण्याची मागणी शेतकरी सुभाष सावंत यांनी केली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी लोकवस्तीत घुसत असून बागायती शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. मोठ्या कष्टाने तयार केलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. सरकारने यांचा त्वरित बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पूर्वी जाणकार अगोदर पाण्याची सोय पाहून लोकवस्तीसाठी घरे बांधत होते. आता काळ बदलला असून आताची मंडळी अगोदर घरे बांधतात, नंतर पाण्याची सोय करतात. जंगले ही वन्य प्राण्यासाठी राखीव ठेवली जायची त्यामुळे कधीही चुकून देखील वन्यप्राणी लोकवस्तीत येत नव्हते.

परंतु आता लोकवस्तीत वन्यप्राणी शिरू लागले आणि लोकवस्ती वनात वाढू लागली आहे, वन क्षेत्रात मानवाने अतिक्रमण केल्याचा हा परिणाम आहे, असेही ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.

वनखात्याने बंदोबस्त करावा

पेडणे तालुक्याचा विचार केला तर मागच्या 10 ते 11 वर्षापूर्वी चांदेल, हसापूर, इब्रामपूर, हळर्ण-तळर्ण, पत्रादेवी, कासारवर्णे-हाळी या भागात जंगलातील हत्ती लोकवस्तीत घुसून शेती, बागायातीची, फळा-फुलांची नासाडी करत होते.

आता हे गवे व इतर प्राण्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवलेला आहे. त्याशिवाय माकड आणि खेती पूर्णपणे लोकवस्तीत घुसून थैमान घालीत आहेत. घराची कौले, बागायतचे नुकसान करतात. यांचा वनखात्याने बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

SCROLL FOR NEXT