Goa Crocodiles Dainik Gomantak
गोवा

Crocodile In Goa: करमळी तळ्यात '१०० हून अधिक मगरी' असल्याचा दावा! स्थानिक चिंतातुर

गोमन्तक डिजिटल टीम

Crocodiles At Carambolim Lake

तिसवाडी: पाणथळ म्हणून अधिसूचित केलेल्या करमळी तळ्यात मोठ्या प्रमाणांत मगरींची संख्या वाढल्याने शेतकरी आणि स्थानिक नाराज आहेत. तळाचा ताबा अजूनही वन खात्याकडे असून इतर ठिकाणी पकडण्यात आलेल्या मगरी येथे तळात सोडल्याने प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याने एखादी घटना झाल्यानंतर सरकारला जाग येणार का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

तळ्यात गेलेल्या एक म्हशीला मगरीने मारल्याची घटना घडली होती. या तळात सभोवतालच्या म्हशी जात असल्याने या प्रकारचे हल्ले वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यावर त्वरित उपाय काढणे गरजेचे असल्याची मागणी जोरु धरु लगली आहे. तळ्याच्या परिसरात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. जवळच्या शेतातसुद्धा काम करताना भिती निर्माण झाली आहे. संबंधितांनी त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहेत.

अजूनही ताबा वनखात्याकडेच

करमळी तळे पाणथळ म्हणून अधिसूचित होऊन दोन वर्ष उलटले तरी देखील तळाचा ताबा वन खात्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्वी या तळ्यात शेती केली जात होती, आत्ता देखील काही शेतकरी किनारी शेती करतात, परंतु वन खात्यामुळे त्यांना अडचणींना समोर जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हल्लीच करमळी पंचायतीने तळे व्यवस्थापन समिती गठित करण्याचा ठराव ग्रामसभेत संमत केला होता.

करमळी तळ्यात पूर्वी उन्हाळ्यात शेती केली जायची. तळ्यातील पाण्याचा वापर हा शेतीसाठी व्हावा म्हणून पाणी साठवले जाते होते. त्यामुळे आज ही तळ – सावट अशी खाजन शेती आहे, परंतु वन खात्याकडे ताबा गेल्यापासून तळे सुकवून शेती बंद झाली. आता मगरी आणून सोडल्याने धोका वाढला असून हा प्रकार त्वरित थांबवला पाहिजे.
राजेश नाईक, पंच सदस्य, करमळी पंचायत
तळ्यात आणून मगरी सोडण्याचा प्रकार वन खात्याने थांबला पाहिजे, तसेच असलेल्या मगरींना कुंभारजुवे कालव्यात नेऊन सोडण्याची आवश्यकता आहे. आज १०० हून अधिक मगरी करमळी तळ्यात असल्याने आता म्हशींवर हल्ला केला, उद्या माणसांवर करणार.
गोकुळदास नाईक, शेतकरी, करमळी
या तळ्यात वर्षभर पाणी असल्याने मगरींची संख्या वाढली आहे. यंदा विसर्जनाला जाताना लोकांमध्ये भीतीचे वातरण होते. यासंदर्भात तळे व्यवस्थापन समिती अंतर्गत काही ठराव घ्यावे लागणार आहे. वन खात्याने सुद्धा याची दखल घ्यावी.
दिनेश उसगावकर, स्थानिक, कमळी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT