Criminal record against Candidates for rushing to fill up application for goa assembly election 2022 Dainik Gomantak
गोवा

अर्ज भरताना झुंबड केल्याने उमेदवारांच्या विरोधात गुन्हा नोंद

कोविडच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: उमेदवारी अर्ज भरताना गर्दी करून माहामारी पसरण्याची शक्यता निर्माण केल्याने काल गुरुवारी मडगावात उमेदवारी अर्ज भरलेले उमेदवार आणि त्यांचे असंख्य समर्थकां विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा फातोर्डा पोलिसांत Fatorda Police नोंद करण्यात आला आहे.(Criminal record against candidates for rushing to fill up application for goa assembly election)

हे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांवर भादंसंच्या 188 (सरकारी आदेशाचे उल्लंघन करून कामकाजात व्यत्यय आणणे) आणि 269 (गर्दी करून रोगराई पसरविण्या सारखे वातावरण तयार करणे) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

उप जिल्हाधिकारी विनायक वळवईकर यांच्या तक्रारींवर ही कारवाई केली आहे. उमेदवारी अर्ज भरताना फक्त चार माणसे आणावीत असा आदेश असतानाही काल कित्येक उमेदवारांनी लोकांना बोलावून शक्ती प्रदर्शन केले होते. त्यामुळे अर्ज भारण्यांच्या ठिकाणी लोकांची अफाट गर्दी झाली होती. कोविडच्या COVID-19 पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT