Mapusa Court Dainik Gomantak
गोवा

Mapusa Court : ड्रग्सप्रकरणी डिमिन्सचा जामीन नामंजूर

संशयिताकडे दोन देशांचे पासपोर्ट : एनसीबीकडून न्यायालयाला माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : ड्रग्जप्रकरणी रशियन नागरिक संशयित अँड्रे डिमिन्स याच्याविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेली कारवाई पुराव्यासह स्पष्ट होत आहे. संशयिताजवळ दोन वेगवेगळे पासपोर्ट आहेत. तो राहत असलेल्या जागेत गांजाची रोपटी लावलेली सापडली होती. त्यामुळे तो ड्रग्स व्यवहारात असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य होणार नाही असे निरीक्षण करत म्हापसा न्यायालयाने त्याचा जामिनाचा अर्ज फेटाळला.

एनसीबीने 29 एप्रिल 2023 रोजी आश्‍वे बीच येथे संशयित अँड्रे डिमिन्स व त्याचा साथीदार आकाश म्हार्दोळकर याला ताब्यात घेतले होते. तो राहत असलेल्या ठिकाणी झडती घेण्यात आली, तेव्हा 8.8 ग्रॅम कोकेन, 16.49 हशिश, 410 ग्रॅम गांजाची रोपटी, 0.88 ग्रॅम एलएसडी ब्लॉटस् व 1.440 किलो गांजा सापडला होता.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यावर संशयित आकाश म्हार्दोळकर याने संशयिताविरुद्ध दिलेली जबानी हा पुरावा धरता येत नाही. संशयित गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात असल्याने तो पळून जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला शर्ती व अटी घालून जामीन द्यावा, अशी विनंती संशयिताच्या वकिलाने केली कोर्टाकडे केली होती.

इतर विक्रेत्यांना करत असे विक्री

एनसीबीच्या वकिलांनी सांगितले, की डिमिन्सजवळ सापडलेले दोन वेगवेगळे पासपोर्ट दोन वेगवेगळ्या देशांचे आहेत. तो ड्रग्स विक्रेता होता व इतर विक्रेत्यांना ड्रग्ज पुरवठा करत होता. आकाश याने त्याच्याकडून ड्रग्ज घेतले होते, असे चौकशीत उघड केले होते. यावरून संशयित अँड्रे डिमिन्स हा ड्रग्स व्यवसायात असल्याचे उघड होते, अशी बाजू न्यायालयात मांडण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT