फोंडा: बाणस्तारी अपघातप्रकरणातील संशयित गोवा आपचे अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठीचा अर्ज क्राईम ब्रँचने फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
पालेकर यांनी एकदा परवानगी घेतली, मात्र त्यानंतर विदेशात गेले. तेव्हा परवानगीशिवाय प्रवास केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
न्यायालयाने त्यांना घातलेल्या अटीचे उल्लंघन केल्याने जामीन रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या या अपघातानंतर मर्सिडिज कार चालक परेश सावर्डेकर, अॅड. अमित पालेकर व त्यांच्या इतर मित्रांनी माशेल येथील अत्रेय सावंत याच्या घरी कटकारस्थान रचून गणेश लमाणी या तरुणाला चालक म्हणून पोलिसांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या अपघाताचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्यात आल्यावर अॅड. अमित पालेकर यांना ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अटक झाली होती.
क्राईम ब्रँचने आपला जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असल्याची कल्पना नाही. न्यायालयाकडूनही मला नोटीस आलेली नाही. अर्जाची प्रत हाती मिळाल्यावर त्यासंदर्भातची बाजू न्यायालयात मांडू. सोशल मीडियामधूनच मी यासंदर्भात ऐकले आहे.अॅड. अमित पालेकर, 'आप'चे अध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.