Goa: दही हंडीला दोन बियर फ्री! गोव्यातील रिसॉर्टची वादग्रस्त जाहिरात, हिंदू जनजागृती समिती आक्रमक, पोलिसांत तक्रार

Morjim Resort Goa: हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने वादग्रस्त पोस्ट हटवून कार्यक्रम रद्द केला.
दही हंडीला दोन बियर फ्री! गोव्यातील रिसॉर्टची वादग्रस्त जाहिरात, हिंदू जनजागृती समिती आक्रमक, पोलिसांत तक्रार
Hindu Janjagruti Samiti Members At Mandrem Police StationDainik Gomantak
Published on
Updated on

Krishna Janmashtami 2024 Goa

पेडणे: मोरजी येथील एका प्रसिद्ध बीच रिसॉर्ट’मध्ये जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दही हंडी कार्यक्रमात बियर फ्री देण्याची घोषणा केली. याप्रकरणाची हिंदू जनजागृती समितीने दखल घेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रार नोंदवल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवली आहे. तसेच, नियोजित कार्यक्रम देखील रद्द केला आहे.

मांद्रेतील फोक्सोसोला बीच रिसॉर्टमध्ये जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दही हंडीकार्यक्रमाच्या जाहिरातची पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्‍यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.

याविषयी माहिती मिळाल्यानंतर हिंदू जनजागृती समिती आणि हिंदूत्वनिष्ठ यांच्या शिष्टमंडळाने मांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांची भेट घेऊन रिसॉर्टचे विज्ञापन आणि कार्यक्रमाचे आयोजन यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले.

दही हंडीला दोन बियर फ्री! गोव्यातील रिसॉर्टची वादग्रस्त जाहिरात, हिंदू जनजागृती समिती आक्रमक, पोलिसांत तक्रार
Goa Bridges: गोव्यातील पूल किती सुरक्षित? सरकार 17 कोटी खर्चून करतंय 1000 पूलांचे सर्वेक्षण

यानंतर पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांनी रिसॉर्टच्या संचालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. या वेळी रिसॉर्टचे संचालक जगदीश प्रजापती यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या समोर व्यवस्थापनाच्या वतीने सर्वांची क्षमा मागितली आणि कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले.

यावेळी हिंदुत्वनिष्ठ शिष्टमंडळात सर्वश्री सलील बांदेकर, सूजन नाईक, सूरज चोडणकर, विनोद वारखंडकर, स्वरूप नाईक, विनायक च्यारी, अजित नागराज, सुनीता नागराज, उज्ज्वला गाड, हविता शेटगावकर, श्रीमती आरती फडते, गजानन पेडणेकर, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या राजश्री गडेकर, हिंदु जनजागृती समितीचे अंकुश नाईक, शिवा परब सनातन संस्थेच्या शुभा सावंत आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com