AAP Goa | Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Banastarim Accident Case: बाणस्तारी अपघात प्रकरणी पालेकरांवर अटकेची टांगती तलवार; कोर्टाची परवानगी न घेता 'विदेशवारी'

Amit Palekar: बाणस्तारी अपघात प्रकरणातील संशयित असलेले ॲड. अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठीचा अर्ज क्राईम ब्रँचने फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बाणस्तारी अपघात प्रकरणातील संशयित असलेले ॲड. अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठीचा अर्ज क्राईम ब्रँचने फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला आहे. न्यायालयाची परवानगी न घेता पालेकर यांनी विदेशात चारवेळा प्रवास केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या अर्जावरील प्राथमिक सुनावणीवेळी फोंडा न्यायालयाने पालेकर यांना नोटीस बजावली आहे व सुनावणी येत्या शुक्रवारी ठेवली आहे. न्यायालयाने त्यांना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने जामीन रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.

गेल्यावर्षी झालेल्या या अपघातानंतर मर्सिडिज कारचालक परेश सावर्डेकर, ॲड. अमित पालेकर व त्यांच्या इतर मित्रांनी माशेल येथील अत्रेय सावंत याच्या घरी कटकारस्थान रचून गणेश लमाणी या तरुणाला चालक म्हणून पोलिसांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अपघाताचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्यात आल्यावर ॲड. अमित पालेकर यांना ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अटक झाली होती. पोलिसांना खरी माहिती देण्यापासून तसेच घटनास्थळाच्या ठिकाणी असलेले पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यामध्ये ॲड. पालेकर यांचाही सहभाग होता, असे पोलिसांना केलेल्या तपासावेळी आढळून आले होते.

ॲड. अमित पालेकर यांना १ सप्टेंबर २०२३ रोजी सशर्त जामीन फोंडा न्यायालयाने दिला होता. त्यात अनेक अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाऊ नये. त्याचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यांने फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे अर्ज करून १० नोव्हेंबर २०२३ ते २५ नोव्हेंबर २०२३ या काळात फ्रान्सला जाण्यासाठी परवानगी मागितली होती.

पोलिसांकडे यासंदर्भात बाजू मांडण्यास सांगून न्यायालयाने त्यांना मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यांनी १ सप्टेंबर २०२३ ते १० जून २०२४ पर्यंत केलेल्या विदेश प्रवासाची माहिती मुंबईच्या एफआरआरओ कार्यालयाकडे पोलिसांनी मागितली होती. या फ्रान्सच्या विदेशी दौऱ्याव्यतिरिक्त पालेकर यांनी न्यायालयाची परवानगी न घेता चारवेळा देशाबाहेर गेल्याचे एफआरआरओ मुंबईने दिलेल्या माहितीतून समोर आले होते.

जामीन रद्द करण्याची पोलिसांची विनंती

२५ जानेवारी २०२४ ते २९ जानेवारी २०२४ या काळात थायलंड (बँकॉक), ७ मार्च २०२४ ते ११ मार्च २०२४ या काळात दुबई, १८ एप्रिल २०२४ ते २२ मार्च २०२४ या काळात थायलंड (बँकॉक) व १८ मे २०२४ ते २९ मे २०२४ या काळात हाँगकाँग या देशात प्रवास केला होता. या चारही ठिकाणी जाण्यापूर्वी पालेकर यांनी न्यायालयाची परवानगी घेतल्याचे केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. त्यांनी न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती क्राईम ब्रँचने केलेल्या अर्जात तपास अधिकारी निनाद देऊलकर यांनी केली आहे.

ॲड. अमित पालेकर, ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष

क्राईम ब्रँचने माझा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असल्याची कल्पना नाही. न्यायालयाकडूनही मला नोटीस आलेली नाही. अर्जाची प्रत हाती मिळाल्यावर त्यासंदर्भातची बाजू न्यायालयात मांडू. सोशल मीडियामधूनच मी यासंदर्भात ऐकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT