Bird conservation campaign X
गोवा

Migratory Birds: गोव्यातील झाडांवर, पाणवठ्यांवर दिसणारे; जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारे स्थलांतरित पक्षी

World Migratory Bird Day: जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे गोव्यात हिवाळ्याच्या मोसमात आम्हाला आकाशात दिसतात.

Sameer Panditrao

10 मे रोजी जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस साजरा झाला. यानिमित्ताने यंदा, त्यादिवशी, 2025 वर्षासाठी जागतिक स्तरावर एक नवीन मोहीम- 'शेअर्ड स्पेसेस- क्रिएटिंग बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज' मोहीम जाहीर केली गेली. जगात सर्वत्र पक्षी अनुकूल शहरे आणि समुदाय तयार करण्यासाठी ही मोहीम समर्पित आहे.

जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे गोव्यात हिवाळ्याच्या मोसमात आम्हाला आकाशात दिसतात. गोव्यातील झाडांवर, पाणवठ्यांवर या पक्ष्यांना बागडताना आम्ही त्या दिवसात पहात असतो. त्यामुळे गोव्यात देखील आपल्याला 'जागतिक स्थलांतरित पक्षी' संघटनेने सुरू केलेल्या या मोहीमेचे भागीदार बनण्यास संधी आहे. 

Birds

गजबजलेली शहरे, लहान शहरे, गावे आणि त्यात राहणारा समुदाय यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांना आधार देणारे अनुकूल वातावरण तयार करणे यावर या मोहिमेद्वारे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक जण काही करू शकेल अशा कृती त्यात आखल्या गेल्या आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे आणि विस्तारणाऱ्या शहरी विकास कामामुळे स्थलांतरित पक्ष्यांना भेडसावणाऱ्या अनेक आव्हानांबद्दल जागरूकता वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

चांगल्या शहर नियोजनाद्वारे पक्ष्यांसाठी निरोगी निवासस्थान निर्माण करणे, प्रदूषण कमी करणे, काचेच्या खिडक्या आणि इतर मानव निर्मित वस्तूंशी त्यांची धडक टाळणे यासारख्या पक्षी अनुकूल पद्धतींचा अवलंब करून आम्ही स्थलांतरित पक्ष्यांच्या अस्तित्वाला आपले महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो. 

शाश्वत शहरी विकास चांगल्या 'अपस्ट्रीम' नियोजनाद्वारे करून पक्ष्यांच्या वस्तींचा विस्तार होणे आणि त्यांचा नाश टाळणे शक्य आहे.‌ शाळा, विविध स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने प्रत्येक जण पक्ष्यांचे संरक्षण करू शकतो आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी त्यांच्या अस्तित्वाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवू शकतो. त्यासाठी शहरांमध्ये निसर्गाला वाव देणे आणि अधिकाधिक नैसर्गिक वातावरण आपल्या सभोवताली तयार करणे गरजेचे आहे. जैवविविधतेवर होणारे शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. www.worldmigratorybirdday.org या संकेतस्थळावर जाऊन या मोहिमेविषयी आपण अधिक माहिती मिळवू शकता.

जागतिक स्थलांतरित पक्षी दिन, संकेतस्थळावरून

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पत्रादेवी नाक्यावर 'पीओपी' गणेशमूर्ती जप्त; मोपा पोलिसांची कारवाई, कोल्हापूरच्या एकास अटक

Goa Assembly Live Updates: ‘गोवा एसटी प्रतिनिधीत्व विधेयक पुन्हा अडवले, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचा निषेध’; CM सावंत यांचा आरोप

राम कृष्ण हरी! पंढरपूरच्या वारकऱ्यांना गोवा सरकार देणार आर्थिक मदत, अधिवेशनात एकमताने ठराव मंजूर

Lionel Messi: मुंबईत दिसणार 'मेस्सी' मॅजिक... 14 वर्षांनी भारतात येतोय 'वर्ल्ड चॅम्पियन', विराट-रोहितसोबत खेळणार क्रिकेट

Goa Assembly 2025: गोवा सरकारचा स्तुत्य निर्णय, आता शालेय जीवनातच मिळणार शेतीचे धडे; आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल

SCROLL FOR NEXT