PM Modi  Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण करा'

औद्योगिक संघटनांचे पंतप्रधान मोदींना साकडे

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील मंत्रिमंडळ शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी (28 मार्च) गोव्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्‍यातील उद्योजकांच्या प्रमुख संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त पत्रकात गोव्यात औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करा आणि उद्योगांशी संबंधित असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकारण्यांची नियुक्ती न करता अनुभवी व्यावसायिकांची नेमणूक करा अशी कळकळीची विनंती केली आहे.गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, गोवा उद्योजक संघटना, क्रेडाय आणि व्हीआयए या चार प्रमुख उद्योजक संघटनांनी हे संयुक्त निवेदन दिले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उद्योजकांचे म्हणणे आस्थापूर्वक ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांचे आभार मानतानाच गोव्यात जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी बरेच काही करण्याचे बाकी आहे याकडे त्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रशासनात पारदर्शकता आणण्याबरोबरच भ्रष्टाचार निपटून काढण्याबरोबरच उद्योगांना जलदगतीने परवाने देण्याची गरज आहे. अनेक तपासण्या आणि वार्षिक नूतनीकरण यांसारख्या किचकट पद्धतीतून उद्योगांना मुक्त केले पाहिजे. परवाना आणि मंजुरी प्रक्रिया जलद करण्यासाठी वाटल्यास एखाद्या व्यावसायिक एजन्सीचे सहकार्य घ्यावे अशी सूचनाही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gen Z Protest in Nepal: सोशल मीडिया बॅनचा नेपाळला फटका, युवा पिढी आक्रमक; थेट संसदेत घुसुन तोडफोड Watch Video

Asia Cup 2025: 8 संघांचे 8 धुरंधर फलंदाज, आशिया कपमध्ये ठरतील 'गेमचेंजर'; जाणून घ्या कोण आहेत हे स्टार्स

सात मुली अनाथ झाल्या, गरीब कुटुंबाने कमवता पुरुष गमावला; गोव्यात रोजंदारी करणाऱ्या मजुराचा सर्पदंशाने मृत्यू

गोव्यात महिला न्यायाधीश आणि तिच्या पतीला धक्काबुक्की, रेस्टॉरंटमधून बाहेर हाकलंल; परस्परविरोधी गुन्हा नोंद

Kadamba Bus Accident: इलेक्ट्रिक कदंब झाली ब्रेकडाऊन, पार्क केलेल्या गाड्यांना दिली धडक; ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा

SCROLL FOR NEXT