Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील धिरयो रोखण्यास कृती आराखडा तयार करा'

खंडपीठाचा पोलिस खात्याला आदेश

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील ‘धिरयो’ रोखण्यासाठी सूचना करणारे निवेदन चार आठवड्यात याचिकादार गोवा फाउंडेशनने तयार करून ते पोलिस महासंचालकांना सादर करावे. या निवेदनात केलेल्या सूचनांनुसार पोलिस महासंचालकांनी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी राज्यात करण्याचे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा फाउंडेशनची याचिका आज निकालात काढली.

राज्यात ‘धिरयो’ला बंदी असून अनेक भागात त्या आयोजित केल्या जातात. अनेकदा या धिरयोमध्ये ज्या बैलांचा किंवा रेड्यांच्या झुंजी लावण्यात येतात त्याची जाहिरात डिजीटल प्लॅटफॉर्मवरून केली जाते. या धिरयो सकाळी पहाटेच्या सुमारास आयोजित केल्या जातात व त्याची माहिती मिळूनही पोलिस उशिरा पोहचतात. धिरयोच्या ठिकाणी पैजा लावण्यासाठी लोकांची गर्दी असते, तर काही पैजा या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. धिरयो रोखण्यात पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत आहे अशी बाजू खंडपीठासमोर मांडण्यात आली. ही सर्व माहिती याचिकादारने एकत्रित करून त्यासंदर्भात सूचनांचे निवेदन पोलिस खात्याला द्यावे. पोलिस खात्याकडून कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल व त्या रोखण्यासाठी सर्व ती जबाबदारी पोलिस खात्याची राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana: 'जास्त प्रेम करणारे...', स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली Watch Video

ZP Election 2025: सावळ-शेट्येंची 'सेमीफायनल', दोघांनीही थोपटले दंड; डिचोलीतील लाटंबार्सेत प्रचार 'तापला'

Konkan Railway: कोकण रेल्वेचा फुकट्यांना दणका; विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 17.83 कोटी दंड वसूल

Goa Crime: अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करून मुंबई येथे अत्‍याचार, संशयित पसार; पोलिसांकडून शोध सुरू

Canacona: विद्यार्थिप्रिय शिक्षिकेची बदली रद्द, मुलांचा हट्ट पूर्ण; पालकांच्‍या आंदोलनाला यश

SCROLL FOR NEXT