PM Modi  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण करा; उद्योजकांच्या प्रमुख संघटनांची मागणी

महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकारण्यांची नियुक्ती न करता अनुभवी व्यावसायिकांची करा

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यातील मंत्रिमंडळ शपथविधीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या गोव्यात येत असल्याचा पार्श्वभूमीवर आज गोव्यातील उद्योजकांच्या प्रमुख संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त पत्रकात गोव्यात औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करा आणि उद्योगांशी संबंधित असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकारण्यांची नियुक्ती न करता अनुभवी व्यावसायिकांची नेमणूक करा अशी कळकळीची विनंती केली आहे. (Create a Healthy environment for industrial investors in Goa)

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, गोवा उद्योजक संघटना, क्रेडाय आणि व्हीआयए या चार प्रमुख उद्योजक संघटनांनी हे संयुक्त निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) हे उद्योजकांचे म्हणणे आस्थापूर्वक ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच गोव्यात जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी अजून बरेच काही करण्याचे बाकी आहे याकडे त्यांनी प्रधानमंत्र्यांचे (Prime Minister Narendra Modi) लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी प्रशासनात पारदर्शकता आणण्याबरोबरच भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्याची गरज असून उद्योगांना जलद गतीने परवाने आणि अन्य मंजुऱ्या देण्याची गरज व्यक्त केली आहे. ना ना तरेच्या तपासण्या आणि वार्षिक नूतनीकरण यासारख्या किचकट पद्धतीतून उद्योगांना मुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. परवाना आणि मंजुरी प्रक्रिया जलद करण्यासाठी वाटल्यास एखाद्या व्यावसायिक एजन्सीचे सहकार्य घ्यावे अशी सूचना केली आहे.

उद्योगांशी निगडित असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीची नेमणूक करण्याऐवजी अनुभव असलेल्या एखाद्या व्यावसायिकाची नेमणूक करावी. जर राजकीय व्यक्तीची नेमणूक केलीच तर तिचा संबंद रोजच्या व्यवहारात न ठेवता केवळ धोरणात्मक निर्णय घेण्यापूरता सीमित ठेवावा अशी मागणी केली आहे.

सध्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता उद्योजक आपल्यासाठी कुठल्याही सवलती मागत नाहीत. मात्र गोव्यात उद्योजकांना भ्रष्टाचारमुक्त (Corruption) वातावरणात काम करण्यासारखे वातावरण निर्माण करावे आणि प्रत्येक कामासाठी ठराविक मुदत ठरवावी आणि त्या कालमर्यादेत ते काम पूर्ण व्हावे अशी पद्धती तयार करावी अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT