Mining Pit in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Mining Pit in Bicholim : धोका वाढला; लामगाव येथील खंदकाला तडा

सध्या प्रशासनाकडून याची पाहणी सुरु आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mining Pit in Bicholim : डिचोलीतील लामगावच्या माथ्यावरील खंदकाला काही प्रमाणात तडा गेल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खाण परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. खाणपिठाला तडा गेला असला, तरी तूर्तास त्यापासून कोणताही धोका नसल्याची माहिती मिळाली आहे. असं असलं तरीही हा तडा वाढत गेल्यास त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. सध्या प्रशासनाकडून याची पाहणी सुरु आहे.

मात्र, आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी सायंकाळी सरकारी अधिकाऱ्यांनी खाण परिसराची पाहणी केल्याचे समजते. खाण आणि भुगर्भ खाते, जिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस, अग्निशामक दल, वन आदी खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची माहिती मिळाली आहे.

खाण लीजक्षेत्र खाली करण्याची पाळी आल्यामुळे यावर्षी खाणीवर मान्सूनपूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे काहीसी ढिलाई झाली होती. पावसाळ्यात तर मध्यंतरी लामगावच्या माथ्यावरील खाणपीठ तुडुंब भरले होते. तरीदेखील सुदैवाने पावसाळ्यात कोणतीही आपत्ती ओढवली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

Goa Live News Updates: सत्तरीत घरात घुसून, चाकू हल्लाकरत ऐवज लुटला

Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

Ashadhi Ekadashi: गोमंतकीयांना उत्तम आरोग्‍य, सुख, समृद्धी लाभो! आरोग्‍यमंत्र्यांचे श्री विठूरायाला साकडे

Goa Fraud: मोबाईल लिंकवर पैसे पाठवले, नंबर झाला 'नॉट रिचेबल'; क्रिप्टोतून जादा परताव्याच्या आमिषाने 3.35 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT