COVID-19 sub-variant JN.1 in Goa Dainik Gomantak
गोवा

COVID-19 in Goa: मंत्री विश्वजित राणे म्हणतात, 'घाबरू नका, काळजी घेतली तर कोरोनाचे संकट टळेल...'

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.

Kavya Powar

COVID-19 sub-variant JN.1 in Goa: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यातच कोरोनाच्या जेएन-1 या नव्या व्हेरीयंटमुळे चिंतेत आणखीच भर पडली आहे. राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, 'ज्यावेळी कोविड-19 चे संकट राज्यावर होते तेव्हा आपण सर्वांनी नियमांचे पालन करत योग्य ती खबरदारी घेतली होती. त्यामुळे आपण त्या परिस्थितीमधून सुखरूप बाहेर पडलो. आता कोरोनाच्या या नव्या संकटाला परतवून लावण्यासाठी देखील आपल्याला खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.' पणजीत आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सध्या राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असले तरीदेखील कुणीही घाबरून जाऊ नये. योग्य ती खबरदारी घेतल्यास रुग्णसंख्या वाढीला आळा घालता येऊ शकतो. याबाबत मी आरोग्य खात्याला देखील सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकाने या सुचनांचे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

डिसेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण का वाढतात?

वर्षाअखेरीस राज्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ख्रिसमस, नवीन वर्षाचे स्वागत, सनबर्न तसेच विविध संगीत कार्यक्रमांमुळे लाखों पर्यटक याकाळात गोव्यात असतात. अफाट गर्दीमुळे आजारांचे संक्रमण वाढत असून यामुळे कोरोनाचे संक्रमणही झपाट्याने पसरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT