पणजी: गोव्यात 30 डिसेंबर 2021 पासून 6 जानेवारी पर्यंत 4,106 नवीन कोविड प्रकरणे समोर आली आहेत. ख्रिसमस व नवीन वर्षाच्या (New year) स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी हजेरी लावली होती. परिणामी गोव्यातील अनेक भागात अनियंत्रित गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. या गर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Goa Covid 19 Latest News Updates)
गुरुवारी, आरोग्य सेवा संचालनालयाने 971 नवीन कोविड-19 (COVID-19) प्रकरणे आणि दोन मृत्यूची नोंद केली. आता पर्यंत एकूण मृतांची संख्या 3,528 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत 4,744 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गुरुवारचा पॉझिटिव्हिटी दर 20.46 टक्के होता.
गेल्या आठवड्यात, 48 बंधितांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्याच बरोबर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सुमारे 14.3 टक्के होता. मडगाव (Margao), पणजी (Panaji), पर्वरी, वास्को या व आसपासच्या भागात कोविड रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आतापर्यंत राज्यात 19 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी आढळलेल्या 8 ओमिक्रॉन बंधितांपैकी 5 रुग्णांची ट्रॅव्लह हिस्टरी नाही. गोव्यासाठी ही बाब चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.