Kalso festival in Mayem dainikgomantak
गोवा

अखेर मयेतील कळसोत्सवाला न्यायालयाची परवानगी

मयेतील कळसोत्सवाला न्यायालयाची परवानगी, यंदाही कळसोत्सव पोलिस बंदोबस्तात

दैनिक गोमन्तक

डिचोली : मयेतील कळसोत्सव मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या काही वर्षांपासून वादात अडकल होता. तो यंदा निर्विघ्नपणे साजरा होणार आहे. या कळसोत्सवाला न्यायालयाची परवानगी मिळाली असून तमाम भक्तगणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला उद्यापासून (ता.७) प्रारंभ होत असून न्यायालयाच्या आदेशानुसार कळसोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. (Court permits Kalso festival in Mayem)

यावेळी डिचोलीचे मामलेदार कुट्टीकर यांनी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवता कामा नये, सर्वांनी सहकार्य करावे असे म्हटले आहे. त्यामुळे यंदाही कळसोत्सव पोलिस बंदोबस्त होईल. उद्या (सोमवारी) सायंकाळी श्री महामाया देवीच्या मंदिरात पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर श्री देवीचा कळस मंदिराबाहेर काढण्यात येणार आहे. नंतर अवसारी मोडासहित देवीचा कळस श्री केळबाय मंदिरात नेण्यात येणार आहे. त्याठिकाणी पूजाअर्चा आदी पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर कळसाचे श्री सातेरी मंदिरात आगमन होणार आहे. दुसऱ्या दिवसांपासून घरोघरी कलश फिरल्यानंतर मंगळवारी (ता.15) कलशाचे श्री महामाया मंदिरात आगमन होणार आहे. त्याठिकाणी कौलोत्सवाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

दोन वर्षे उत्सव नव्हता

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून मयेतील कळसोत्सव गेल्या काही वर्षांपासून वादात अडकला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या (Law and order) प्रश्नावरून २०१९ मध्ये कळसोत्सवासह माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव देवालय प्रशासकाकडून निलंबीत करण्यात आले होते. २०२० मध्येही कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शेवटच्या क्षणी कळसोत्सव रद्द करण्यात आला होता. मात्र नंतर उच्च न्यायालयाने (High Court) परब समाजाला कळसोत्सव साजरा करण्याची मोकळीक दिल्यानंतर त्यावर्षी ७ मार्च रोजी एकाच दिवशी सशस्त्र पोलिस (Armed Police) बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता. गेल्यावर्षी मात्र किरकोळ अपवाद वगळता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात (Police protection) कळसोत्सव साजरा करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT