Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: आमदार मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडीत युवतीस हजर राहायला सांगा...

न्यायालयाचे पोलिसांना आदेश, जबाब नोंदवणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Babush Monserrate: गोव्याचे महसूल मंत्री आणि पणजीचे आमदार मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप असून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.

या बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला 17 ते 20 जुलै या कालावधीत न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी करावे, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिला आहे.

बाबूश यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने यापुर्वीच दिली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी बाबूश उपस्थित नव्हते. तर दुसरी संशयित रोझी फेर्रांवही गैरहजर होत्या.

या प्रकरणातील पीडीत युवती मुंबईत नव्यानेच नोकरीला लागली आहे. तिला तत्काळ सुट्टी मिळणे कठीण आहे. त्यामुळे तिला सुनावणीला येण्यासाठी किमान 10 ते 15 दिवसांचा अवधी मिळावा, अशी विनंती केल्यानंतर न्यायालयाने पीडित युवतीचा जबाब 17 ते 20 जुलै याकाळात नोंदवावा, असे निर्देश दिले आहेत.

आणखी दोन साक्षीदारांना 21 जूनला उपस्थित रहावे, असा समन्स जारी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT