Goa Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

Goa News: आमदार अपात्रता याचिकेवर आज खंडपीठासमोर सुनावणी

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरुद्ध अपात्रतेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर आज खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरुद्ध अपात्रतेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी घटनेनुसार 90 दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश द्यावेत, यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका विशेष खंडपीठासमोर 10 रोजी सुनावणीस येणार आहे.

मागील सुनावणीवेळी खंडपीठाचे न्यायमूर्ती महेश सोनक यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे ही याचिका आता विशेष खंडपीठासमोर सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली आहे.

चोडणकर यांनी सभापतींकडे आमदार अपात्रता याचिका गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला सादर केली आहे. घटनेनुसार सभापतींसमोरील अपात्रता याचिकेवरील सुनावणी 90 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे.

पण या याचिकेला तीन महिने होत आले तरी याचिकेतील प्रतिवादी असलेल्या त्या आठ आमदारांना सभापतींनी अजूनही नोटीस बजावलेली नाही व सुनावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे सभापतींना ही सुनावणी 90 दिवसांत पूर्ण करण्याची सूचना करावी अशी विनंती चोडणकर यांनी याचिकेत केली आहे.

दरम्यान, यापूर्वी सभापती तवडकर यांनी चोडणकर यांच्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी घटनेनुसार 90 दिवसांत पूर्ण केली जाईल असे वेळोवेळी पत्रकारांनी विचारलेल्या उत्तर देताना सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात अजून त्यावरील सुनावणी सुरू केलेली नाही.

चोडणकर यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत सभापतींसह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठही आमदारांना प्रतिवादी केली आहे. त्यामध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, संकल्प आमोणकर व आलेक्स सिक्वेरा यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shivaji Maharaj Navy: ..गोवा पार केला, पोर्तुगीजांना ‘हर हर महादेवने जाग आली; शिवाजी महाराजांची एकमेव नौदल मोहीम

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचे 15 दिवसांचे अधिवेशन; कोणती विधेयके मंजूर? वाचा सविस्तर आढावा

Shravan In Goa: गूळ-खोबऱ्याच्या पातोळ्या, तोणियाची भाजी, ब्राह्मीची चटणी; श्रावणातला आहार

Arshdeep Singh: बुमराह-चहलला जमलं नाही, ते अर्शदीप करणार! T20 मध्ये करणार शतक, 'हा' पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनेल

Goa Live News: कॅफे भोसलेजवळ लहान मुलाचा घेतला कुत्र्याने चावा

SCROLL FOR NEXT