Fraud case at Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फ्लॅट देण्याचे आश्वासन, होंडा सत्तरीत महिलेची 26 लाखांची फसवणूक

Fraud Case at Sattari: फ्लॅटचे आश्वासन देऊन महिलेची 26 लाखांची फसवणूक

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi,Goa

वाळपई: चोरी, फसवणूक आणि दरोडेखोरी यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील विविध भागांमधून अशा अनेक बातम्या नेहमीच समोर येतात.

सत्तरी तालुक्यातील होंडा येथे देखील काहीसा असाच प्रकार घडला. रुपाली परवार नावाच्या एका महिलेने 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत वाळपई पोलिसांकडे एका दाम्पत्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

संशयित दाम्पत्याने वर्ष 2021-22 मध्ये रुपाली परवार यांना फ्लॅट विकण्याचे आश्वासन दिले होते. रुपाली परवार यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार त्यांनी या दाम्पत्याला 23.5 लाख रुपये रोख दिले तर अतिरिक्त अडीच लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले.

पैसे दिल्यानंतर संशयित आरोपींकडून रुपाली यांनी कोणताही फ्लॅट देण्यात आला नाही, किंवा त्यांचे पैसे देखील परत केले गेले नाहीत.

रुपाली परवार यांनी संपूर्ण घटना पोलिसांच्या कानी घातली घातली असून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सदर घटनेचा तपास करीत आहेत मात्र या प्रकारच्या घटनांना आलेला जोर पाहता प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर सुरक्षितता बाळगली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT